Breaking

Shakuntala Railway : “शकुंतला गाडी आहे, गरिबांची नाडी आहे!”

People’s protests to save past glory : शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींकडून निदर्शने; खासदार, आमदार, एडीआरएम यांना निवेदन सादर

Akola शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींकडून विविध मागण्यांसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. “शकुंतला गाडी आहे, गरिबांची नाडी आहे…!”, “शकुंतला रेल्वे सुरू झालीच पाहिजे…!” अशा जोरदार घोषणा देत सत्याग्रहींनी आपला आवाज बुलंद केला. यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे आणि एडीआरएम मीना यांना निवेदन सादर करण्यात आले.

शकुंतला रेल्वे ही प्रवाशांची मूलभूत सेवा आहे. ती कोणत्याही कारणाशिवाय अचानक बंद करण्यात आली असून, ती त्वरित पूर्ववत सुरू करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे नामकरण कर्मयोगी संत गाडगेबाबा जंक्शन रेल्वे स्थानक असे करावे, तसेच या स्थानकाचे सौंदर्यीकरण संत गाडगेबाबा यांची ‘दशसूत्री’ समोर ठेवून करण्यात यावे, अशीही मागणी सत्याग्रहींनी निवेदनाद्वारे मांडली.

E – Buses : एसटीचे व्यवस्थापन कुणाच्या दबावाखाली ?

सत्याग्रहासाठी गुरुवारी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व शकुंतला प्रेमी एकत्र जमले. त्यांनी युगपुरुषांचे छायाचित्र छातीवर लावून स्टेशन चौकातुन घोषणांच्या गजरात रेल्वे स्थानक गाठले.

यावेळी विजय विल्हेकर, प्रकाश बोनगिरे, अविनाश बेलाडकर, अजय प्रभे, प्रकाश निरखे, विलास वानखडे, गजानन देवके, सदानंद तिडके, सुभाष वडुरकर, सुभाष किटे, सुनील पवार, कैलास महाजन, सुरेश जोगळे, अरविंद तायडे, बाळासाहेब खांडेकर, रुपेश चहाकार आदी सत्याग्रही उपस्थित होते.

Farmers Suicide : शेतकऱ्यांच्या मशाली पेटल्या तर काय-काय जाळतील ?

सत्याग्रहींनी स्पष्ट केले की, संत गाडगेबाबा यांचा मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाशी घनिष्ठ संबंध होता. त्यांनी अनेक वेळा हे स्थानक झाडून स्वच्छ केले होते. त्यामुळे या स्थानकाचे नाव त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवले जावे आणि आदिवासी, शेतकरी, कष्टकरी व गरिबांच्या दृष्टीने जीवनवाहिनी असलेली शकुंतला रेल्वे नॅरोगेजमधून पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी निवेदनात व्यक्त करण्यात आली.