NCP Goes on the Offensive, Demands Boost in Cotton and Soybean Meal Exports wrote letter to Devendra Fadanvis : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरी केली काळी दिवाळी
Nagpur : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची मदतही तोकडी दिली जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवणे सुरू केले आहे. विरोधी पक्षांकडून काळी दिवाळी साजरी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्तेत आलो तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. पण एक वर्ष पूर्ण होत असून कर्जमाफी दिलेली नाही. या विलंबामुळे शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली दबलेला आहे. आतातरी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे मदत देण्यात यावी. संत्रा आणि मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदतीची गरज आहे. त्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
Sharadchandra Pawar : होय..! काँग्रेस धोकेबाज, इतर समविचारी पक्षांना सोबत घेणार !
पीक विमा योजनेचे निकष अत्यंत क्लिष्ठ आणि शेतकरी विरोधी आहेत. अनेकदा नुकसान होऊनही पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. पिक लागवडीपासून ते पीक कापणीपर्यंत पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. कापसावर ११ टक्के आयात शुल्क होता. परंतु तो १७ ऑगस्ट २०२५ पासून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रद्द करण्यात आला. त्यामुळे विदेशातून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात केली जात आहे. त्यामुळे कापसाचे भाव कोसळले. परिणामी शेतकऱ्यांना हमीभावसुद्धा मिळत नाही. ११ टक्के आयात शुल्क रद्द झाले पाहिजे. सोबत सोयापेंडची निर्यात वाढवण्याचीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.