Hearing adjourned due to absence of police officer : पोलिस अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे सुनावणी तहकूब?
Wani : यवतमाळ जिल्ह्याला ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी या मागणीसाठी ६ ऑक्टोबर रोजी शिवसेनेकडून वणी येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी अडवले, त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे हे शिवसैनिक अजूनही कोठडीतच आहेत, अशी खंत शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
बुधवारी या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी निश्चित करण्यात आली होती. परंतु, संबंधित पोलिस अधिकारी न्यायालयात गैरहजर राहिल्याने सुनावणी पुन्हा तहकूब होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आजही कोठडीत असलेल्या शिवसैनिकांना दिलासा मिळालेला नाही. या घडामोडीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, स्थानिक स्तरावर प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
Navi Mumbai Airport : पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन!
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. वणीतील आंदोलन हे लोकशाही मार्गाने आणि शांततेत झालं होतं. मात्र, भाजप सरकारने राजकीय सूडबुद्धीने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. जामीन प्रक्रियेवरही दबाव आणला जात आहे,असा आरोप स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे .
सलग पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याला ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वणी येथे मंत्री डॉ. उईके यांच्या ताफ्याला अडवून रास्ता रोको करण्यात आला. मात्र, त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई केली, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
न्यायालयाकडून पुढील सुनावणीची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु, जर सुनावणी पुन्हा तहकूब झाली, तर शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच वणीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्याच्याही चर्चेला वेग आला आहे.
Hearing postponed : शिवसेना वादावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर!
राज्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनेक ठिकाणी आंदोलनं आणि उपोषणं सुरू आहेत. मात्र, वणीतील प्रकरणाला राजकीय रंग देत सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर होत आहे. प्रशासनाच्या विलंबामुळे आणि न्यायप्रक्रियेतील ढिलाईमुळे वणी परिसरात तणाव वाढण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.