Breaking

Siddharth Kharat : तर आज समतेचा समाज तयार झाला असता!

MLA receives Samaj Bhushan Award : आमदार खरात यांना ‘समाज भूषण पुरस्कार’

Buldhana “स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली, तरी देशात सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय पूर्णपणे प्रस्थापित झालेला नाही. आजही पाच टक्के लोकांकडे ९५ टक्के संपत्ती आहे. आणि ९५ टक्के लोक अजूनही वंचित आहेत. जर राज्यव्यवस्थेने संविधानाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली असती, तर समतेचा समाज उभारलेला असता,” असे स्पष्ट मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.

मेहकर येथे १२ मे राेजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात यांना ‘समाज भूषण पुरस्कार’, किशोर गारोळे यांना ‘युवा उद्योजक पुरस्कार’ तर माधुरी पवार यांना ‘अनाथांची आई पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर गारोळे होते, तर उद्घाटक म्हणून माधुरी पवार उपस्थित होत्या.

Bacchu kadu : मी निवडणूक लढवावी, ही तर शिक्षकांची इच्छा!

आमदार खरात म्हणाले, “आता वेळ निघून गेलेली नाही. संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना राजकारणात आणणे अत्यावश्यक आहे. मेहकर मतदारसंघात गेल्या १५ वर्षांतील अंधार संपून परिवर्तनाची नांदी झाली आहे. हा मतदारसंघ राज्यासाठी मॉडेल ठरणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे लोक कधीही महापुरुषांची विटंबना होऊ देत नाहीत. विविधतेतून एकता जपण्याचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे.”

EX-MLA Mohan Joshi : ९३ वर्षे जुनी संस्था, मोहन जोशींकडे अध्यक्षपद!

या कार्यक्रमाला आशिष राहाटे, निंबाजी पांडव, दिलीप वाघ, किशोर आराख, किशोर गवई, संदीप गवई, प्रतीक अंभोरे, रवी पवार, नागेश आराख, योगेश आराख, रवी डुकरे, पिंटू सरदार, प्रवीण भिसे, करण देवाजी, अमर कंकाळ, सागर देवाजी, सोनू देवाजी, मनोज नरवाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.