Relive the memories on the Third Memorial Day : तिसऱ्या स्मृतिदिनाला आठवणींना उजाळा
Amravati अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना चाहणारा वर्ग केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील 25 देशांमध्ये होता. सिंधुताईंच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या सावित्रीबाई फुले आश्रम शाळेच्या आवारात ‘तृतीय पुष्प शब्दांजली महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह माईंवर प्रेम करणाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे सेवानिवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांनी यावेळी सिंधुताई सपकाळ यांच्यासोबतच्या विशेष आठवणी सांगितल्या. ‘सिंधुताई सपकाळ यांचं सानिध्य मला 1978 पासून लाभलं. विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतल्यावर वर्धा येथे मी नोकरीवर होतो. त्यावेळी भजन गाणाऱ्या सिंधुताई यांच्याशी ओळख झाली. पुढे मी पोलीस खात्यात रुजू झालो. जळगावला असताना त्या भागात सिंधुताई सपकाळ यांचं सामाजिक कार्य पहिल्यांदा सर्वांसमोर आलं,’ असं ते म्हणाले.
1991 मध्ये मी अमरावतीत पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झालो. त्यावेळी त्यांचा मेळघाटात चुरणी परिसरात गवळी बांधवांच्या हक्कासाठी व्याघ्र प्रकल्पासोबत संघर्ष सुरू होता. यानंतर पुढं त्यांचं महान सामाजिक कार्य उंच शिखरावर जाऊन पोहोचलं. समाजाला मोठा दिलासा देण्याचं कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं सानिध्य मला लाभलं. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, अशी भावना भाल यांनी व्यक्त केली.
Questions for cotton growers : CCI ची भलती अट; मग त्यांनी कापूस विकावा कुणाला ?
चिखलदरा येथे पहिलं आश्रम
‘सिंधुताई सपकाळ यांनी चिखलदरा येथे 1992 मध्ये निराधार मुलींसाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावानं पहिलं आश्रम सुरू केलं. आज या आश्रम शाळेत 60 ते 70 मुलींना उज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळत आहे. या आश्रमाची जबाबदारी मुलगा म्हणून माईंनी माझ्यावर सोपवली. मात्र, माईंचा वारस म्हणून नव्हे तर अनाथ मुलांसोबत एकरूप होऊन मी वाढलोय. त्यामुळं या अनाथ आश्रममधील मुलांनादेखील मी माईंसारखंच जिव्हाळ्यानं जपतोय,’ असं सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ म्हणाले.
माईंना 25 देशात मिळाला मान!
‘सिंधुताई सपकाळ या केवळ चौथ्या वर्गापर्यंत शिकल्या होत्या. तरीसुद्धा माईंना 25 देशात जाण्याचा योग आला. या सर्व देशांमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. माईंनी बोलायला सुरुवात केल्यावर समोर कितीही कठोर हृदयाची व्यक्ती असला तरी त्या व्यक्तिचं काळीज पाझरल्याशिवाय राहत नव्हतं,’ असं अरुण सपकाळ यांनी सांगितलं.