Breaking

Soybean crop : सोयाबीन विकले तीन हजार आठशेत; तुरीचे दर सात हजारांच्या खाली !

You tell me, sir, how can we afford farming : सांगा साहेब, शेती परवडणार तरी कशी ?

Wardha News : अस्मानी संकटाचा सामना करत पिकाला जपत पीक चांगले यावे म्हणून त्यावर शेतकरी खर्च करतो. मात्र, शेतमाल जेव्हा घरी येतो अन् बाजारपेठेत विक्रीस आणतो, तेव्हा भावात घसरण होते. मग सांगा ना साहेब शेती परवडणार कशी? याचे उत्तर मागणार तरी कुणाला, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

मागील हंगामात तुरीचे भाव दहा हजार ते बारा हजारापर्यंत गेले होते. मात्र, यंदा भाव कमी कसे झाले, हा प्रश्न आहे. एक वेळा एखाद्या वस्तूचा वाढलेला भाव कमी होत नाही मग आमच्या शेतमालाचा भाव कमी का होतो, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले.

Ramdas Tadas : कुस्तीत कलर होल्डर पटकाविणारी खुशाली ठरली द्वितीय मल्ल !

शेतकऱ्यांची आशा तूर पिकावर होती. मात्र, जशी तुरीच्या पिकाची मळणी झाली, तसे तुरीचे भाव ६५०० ते ७००० वर आले आहे. तुरीच्या पिकाला आलेला खर्च निघेनासा झाला आहे. तुरीचे पीक शेतकरी आंतरपीक म्हणून घेत असतात. तर अवघ्या एक महिन्यानंतर गहू मळणी होण्याची शक्यता आहे. आता गव्हाला २,७०० रूपये भाव आहे. मात्र, गहू बाजारपेठेत येताच गव्हाचे भाव हेच राहणार का, हासुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

Dr. Pankaj Bhoyar : महाराष्ट्राला देशातून तिसरा क्रमांक, कोणार्क येथे खाणमंत्र्यांची परिषद !

दिवसेंदिवस शेती तोट्यात जाण्याची कारणमीमांसा केली असता यांत्रिकीकरण झाले असले तरी रोटावेटर, नांगरणी महाग झाली आहे. त्यातच रासायनिक खते, बी बियाणे, फवारणी महागड्या होत जात आहे. त्यातच मजुरीचे वाढलेले दर पाहता शेती मालाचे भाव हे कमी असल्याने शेती व्यवसाय तोट्यात येत असल्याचे शेतकरी सांगतात.

शेती व्यवसाय तोट्यात येत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे मुलं शेती पासून दूर राहणे पसंत करीत आहेत. तर वडिलोपार्जित असलेला शेती व्यवसाय सांभाळत असले तरी तोट्यात चाललेल्या व्यवसायामुळे घर खर्च कसा चालवायचा, असा प्रश्न उभा राहत आहे. शासनाचे शेती विषयक धोरण चुकीचे आहे का हा संशोधनाचा विषय बनला आहे.