350 orphans and destitute children showing skills : चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ
Nagpur माय-बापाचं छत्र नसणे, ही मुलांची चुक नसते. प्रत्येकावर वेगवेगळी परिस्थिती येत असते. पण अशातही अनाथाश्रम आणि निराश्रीतांना आधार देणाऱ्या संस्था अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यांना आधार मिळतो. पण पालकांचं छत्र नसल्यामुळे मुलांची कौशल्य लपत नाहीत. प्रत्येकाला कुठल्यातरी कौशल्याची देणगी मिळाली असते. तशी या मुलांमध्ये देखील उपजत कौशल्य असतात. त्यांना व्यासपीठ हवं असतं. ते व्यासपीठ महिला व बालविकास विभागाने उपलब्ध करून दिलं आहे.
महिला व बालविकास विभाग अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलामुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांच्या हस्ते झाले.
Sports director of Wardha: मानधनात अनियमितता; ‘खेलो इंडिया’चा ‘खेला’!
प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठी संधी दडलेली असते. आपल्याला चांगले व्हायचे आहे, चांगलेच कार्य करायचे आहे अशी मनात खुणगाठ बांधा. मोठी स्वप्न पहा. आपणही एक दिवस चांगला व्यक्ती होऊ हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्याला प्रयत्नांची जोड द्या. तुमच्यामधून पोलीस अधिकारी व्हावेत अशी आमची इच्छा आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास डॉ. हर्ष पोद्दार यांनी दिला.
नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालय या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत ३५० हून अधिक मुलं सहभागी झाली आहेत. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजीत कुऱ्हे, आर्यनमॅन दक्ष खंते आदी उपस्थित होते.
पोलीस अधिकारी व्हा
इतर मुलांपेक्षा वेगळी आव्हाने तुमच्या समोर आहेत. यावर तुम्ही यशस्वी मात करुन तुमच्यातील कलागुणांची चुणूक सिध्द करुन दाखविली आहे. चांगली खिलाडूवृत्ती तुम्ही बाळगली आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर अनुरक्षण गृहातील तुमच्या वास्तव्याला कृतीची जोड द्या. तुमची ओळख चांगले खेळाडू म्हणून व्हावी. तुमच्यापैकी चांगले पोलीस अधिकारी व्हावेत यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्वप्रशिक्षणाच्या सुविधा तुम्हाला येथे उपलब्ध आहेत, असेही ते म्हणाले.