St recruitment : एसटीमध्ये मेगाभरती! तब्बल 17,450 चालक, सहाय्यकांची भरती

Golden opportunity for unemployed, guaranteed salary of 30 thousand : बेरोजगारांसाठी सुवर्णसं, 30 हजार पगाराची गॅरंटी

Mumbai : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) तब्बल 17,450 चालक आणि सहाय्यक पदांसाठी मेगाभरती होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून उमेदवारांना सरासरी 30,000 रुपये पगार दिला जाणार आहे. एवढंच नाही तर, उमेदवारांना एसटीकडून विशेष प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे.

ही माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. 2 ऑक्टोबरपासून या भरतीसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. लवकरच महामंडळाच्या ताफ्यात 8 हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या चालक आणि सहाय्यकांची गरज भागवण्यासाठी ही मेगाभरती केली जात आहे. ही भरती 3 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने होणार आहे. सहा प्रादेशिक विभागनिहाय ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध होईल.

Officers scolding : पैसा तुमच्या बापाचा नाही… माज दाखवू नको !

 

सुमारे 30,000 रुपये मासिक वेतन, एसटीकडून मोफत प्रशिक्षण, 3 वर्षांचा कंत्राटी कालावधी, राज्यभरातील एसटी सेवेचा भाग होण्याची संधी राज्यातील बेरोजगारांना मिळणार आहे. प्रताप सरनाईक म्हणाले, “ही भरती पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल. त्यामुळे तरुणांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.”

दरम्यान, यापूर्वी राज्य सरकारने पोलीस भरतीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना सलग मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

____