Sudhir Mungantiwar ; लंडनमध्ये आ. सुधीर मुनगंटीवारांचा गौरव, ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ने सन्मानित

 

Award presented at the Global Economic Convention in London : ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मध्ये बहाल झाला पुरस्कार

London : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘लोकमत’ समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित भव्य ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ मध्ये त्यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आ.मुनगंटीवार सपत्नीक उपस्थित होते.“हा केवळ पुरस्कार नाही, तर जनसेवेच्या अखंड प्रवासाला मिळालेली प्रेरणा आहे. ज्या अपेक्षेने माझी निवड झाली, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत जनसेवा करीत राहीन,” अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत आणणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांना त्याच लंडनच्या भूमीत मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचालीचे विश्लेषण, जागतिक व्यापारातील भारताची भूमिका, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व हरित ऊर्जा या विषयांवर सखोल चर्चा झाली. अशा भव्य सोहळ्यात आ. मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार बहाल होणे हे त्यांच्या बहुआयामी कार्याचा आंतरराष्ट्रीय गौरव ठरला आहे.

Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश

‘देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या आपल्या अद्वितीय योगदानामुळे आम्हाला अभिमान आहे. या जागतिक व्यासपीठावर आपल्या कार्याचा उत्सव साजरा करणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे,’ असे लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी गौरवपत्रात नमूद केले आहे.

आ. मुनगंटीवार यांच्या कार्याला यापूर्वीही असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त झाले आहेत. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने बहाल केलेली डी.लिट., आज तक आणि इंडिया टुडे तर्फे मिळालेले दोन वेळचे ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया’, स्व. अरुण जेटली यांच्या हस्ते झालेला गौरव, ४ लिम्का रेकॉर्ड, २ गिनेस बुक रेकॉर्ड, वृक्षलागवडीसाठी देशगौरव,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केलेला विशेष उल्लेख, कार्यालयाला मिळालेला देशातील पहिला ISO दर्जा, तसेच महाराष्ट्रियन ऑफ द इयर, फेम इंडिया उत्कृष्ट मंत्री पुरस्कार आणि अशा असंख्य सन्मानांनी त्यांचा प्रवास उजळला आहे.

Sudhir Mungantiwar : ‘ आ. सुधीर मुनगंटीवार यांची ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ सन्मानासाठी निवड’

‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा पुरस्कार केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वैभवाचा सन्मान आहे. चंद्रपूरच्या मातीतून उभा राहिलेले अभ्यासू नेत्याला आज जागतिक स्तरावर मानाचा तुरा ठरत आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वगुणांची, जनसेवेतल्या निष्ठेची आणि विकासदृष्टीची ही मिळालेली दाद महाराष्ट्राच्या अभिमानात भर घालणारी ठरली आहे.