made the remarks at a program held in Talegaon, Wardha district : मोठमोठाले सभागृह आणि रस्ते रुंद, पण मने मात्र संकुचित होत चालली
Talegaon – Wardha : हरिभक्त पारायण आणि वारीमध्ये वीणा घेऊन जगातील सर्वांगसुंदर स्वर लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार हा सर्वोत्तम उपक्रम आहे. अशा कार्यक्रमांना रात्री उशिरापर्यंत जनतेने केलेली गर्दी ही खरंच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे वारकरी संप्रताय कलावंत संमेलन, सत्कार समारंभ तसेच बचतगट महिला मेळावा आणि भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, या जगातील सर्वात मोठे सिंहासन कोणते, असा प्रश्न कुणाला विचारला तर ते राजवाड्यातील दरबार, संसद किंवा विधानसभेतील खुर्चीचा उल्लेख करतील. पण यक्षाने धर्मराजाला हा प्रश्न विचारला असता, तर जनतेच्या हृदयातील स्थान हेच सर्वात मोठे सिंहासन आहे, असे धर्मराजाने सांगितले असते.
Sudhir Mungantiwar : दिलेला शब्द मुनगंटीवारांनी काही तासांतच केला पूर्ण !
कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, आमदार राजेश बकाने, आमदार सुमीत वानखेडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते उपस्थित होते. आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, मी अर्थमंत्री असताना हरीतवारीची सुरूवात केली. आळंदीच्या वारीच्या पहिल्या पुजेचा मान मला मिळाला. त्यावेळी मी तेथे उपस्थित वारकऱ्यांच्या कपड्यांकडे बारकाईने बघितले तर ते सर्वसामान्य कुटुंबांतील वाटत होते. पण त्यांच्या चेहऱ्यांकडे बघितले तर ते जगातील सर्वात श्रीमंत लोक वाटत होते. त्यांच्या ओठांतून विठ्ठलाचे नाव निघत होते आणि चेहऱ्यावर कमालिचा आनंद व उत्साह होता.
भौतिक साधनसंपत्ती वाढत असताना शरीराचे समाधान नक्कीच मिळते, मात्र मनाचे समाधान भौतिक सुखसुविधांमध्ये शक्य नाही. मनाला समाधान देण्याचे सामर्थ्य केवळ भक्तीमध्ये आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले.‘काही दिवसांपूर्वी मी लंडनमध्ये कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार स्वीकारायला गेलो होतो. त्यावेळी तेथे वास्तव्य करणारे महाराष्ट्रातील काही कुटुंब मला भेटायला आले. त्यांच्यासोबत आलेल्या तरुणांना मी ‘भविष्यात काय व्हायचंय?’ असा प्रश्न विचारला. त्यातील बहुतांश तरुणांनी मानसोपचारतज्ज्ञ होणार असल्याचे सांगितले. इंग्लंडमध्ये भौतिक सुविधा खूप आहेत, पण मनाच्या समाधानाचे उपाय नाहीत. त्याचे कारण त्यांच्या कुटुंबपद्धतीमध्ये दडले आहे. आपल्याकडे ही परिस्थिती नाहीच्या बरोबर आहे. त्याला ईश्वराची भक्ती आणि संस्कार ही मुख्य कारणे आहेत.
Prajakata Mali : ..अन् म्हणूनच सुधीरभाऊंना विकासपुरूष म्हटले जाते !
आज मोठी सभागृहे आणि रुंद रस्ते उभे राहत आहेत, पण दुर्दैवाने मने मात्र संकुचित होत चालली आहेत. या संकुचिततेवर मात करून समाजात सद्भावना आणि मूल्यसंस्कार रुजविण्याचा एकमेव उपाय म्हणजे हरिभक्त परायणाच्या माध्यमातून संस्कार करणे हो,, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.