Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार मुबलक युरीया, मुनगंटीवारांनी दिले निर्देश !

Held an Important Meeting with Officials of the District Agriculture Department : जिल्ह्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत घेतली महत्वपूर्ण बेठक

Chandrapur : खत टंचाई ही शेतकऱ्यांना दर हंगामात भेडसावणारी समस्या आहे. त्यातल्या त्यात युरीयाची टंचाई तर पाचवीलाच पुजलेली. शासनाने खतांचे अनेक रॅक पॉइंट घोषीत केले. पण नंतर ते कधीच तयार झाले नाहीत, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पण यावर्षी शेतकऱ्यांना एक बॅगसुद्धा युरीयाची टंचाई भासू नये, यासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे आले आहेत. यासाठी त्यांनी नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि शेतकऱ्यांपर्यंत खत वेळेत कसे पोहोचेल, याचे काटेकोर नियेजन करण्याचे निर्देश दिले.

कृषी विभाग करत असलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा स्वतः आमदार मुनगंटीवार करणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना आता नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. शेती हंगामाच्या पृष्ठभूमीवर खत/युरीया टंचाईची समस्या शेतकऱ्यांसमोर आ वासून उभी आहे. पण आमदार मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात HURL कंपनीचे १२५० मेट्रीक टन आणि NBCL (Narmada) कंपनीचे १५०० मेट्रीक टन युरीया खत लवकरच उपलब्ध होणार आहे. बल्लारपूरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गरजा लक्षात घेऊन आणि किसान मोर्चाने केलेल्या विनंतीवरून आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यालयात खतासंदर्भात आढावा बैठक घेतली.

Sudhir Mungantiwar : हा रक्ताचा एक थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा ! : हा रक्ताचा एक थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा !

यावेळी आमदार मुनगंटीवार म्हणाले, युरीया खताचे वाटप काटेकोर नियोजनानुसार प्रत्येक कृषी केंद्रावर तसेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत खत वेळेत पोहोचेल या दृष्टीने नियोजन करावे. याशिवाय प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर थेट FIR दाखल करावी. आजघडीला मुल तालुक्यात फक्त २.५ टन खत उपलब्ध आहे. पोंभूर्णा येथे एकही बॅग उपलब्ध नाही, ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्या, असेही निर्देश त्यांनी दिले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न, चंद्रपुरात लवकरच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र

बैठकीला कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी पवार, बल्लारपूरचे गुणनियंत्रक, तालुका कृषी अधिकारी गायकवाड, पोंभुर्णाचे गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी गवळी, चंद्रपूरच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी गोडबोले, मूलचे गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी गजभिये, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, भाजपा किसान महानगर मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रवी चहारे आदींची उपस्थिती होती.