Breaking

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांचे दमदार भाषण, खेळाडुंमध्ये भरला जोश !

Sudhir Mungantiwar’s powerful speech filled the players with enthusiasm : ऑलम्पिक २०३६ मध्ये मेडल घेणारा खेळाडू चंद्रपूरचा असला पाहिजे

Chandrapur : खेळाच्या मैदानावर उतरल्यावर जिद्दीने आपला खेळ खेळा. फक्त खेळाचे मैदान म्हणून या भूमिकडे बघू नका. तर तुम्ही वाघांच्या भूमित आले आहात. तेव्हा हा महोत्सव तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला पाहिजे, अशी कामगिरी करून दाखवा, असे आवाहन राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर येथे गोंडवाणा विद्यापीठातर्फे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘राज्याच्या ३ लाख ७ हजार ७१३ स्क्वेअर किलोमिटर परिसरातून आलेल्या सर्व सळसळत्या रक्ताच्या युवा मित्रांनो, लाडक्या बहीणींनो, विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, प्राध्यापिका, आमच्या लाडक्या बहीणी आणि खेळाडुंचा उत्साह वाढवण्यासाठी आलेल्या सर्वांचे मी वाघांच्या भूमित स्वागत करतो, असे म्हणत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दमदार भाषणाला सुरूवात केली. त्यांच्या भाषणाने राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींमध्ये जोश भरला.

Raksha Khadse : सुधीरभाऊंचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, रक्षा खडसे यांना विश्वास !

व्यासपीठावर केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी विनय गौडा, गोंडवाणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोखारे, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, भाजपचे पदाधिकारी काशी सिंह, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्वलंत कडू, समीर केणे, सविता कांबळे, नम्रता ठेमस्कर, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, सिनेट सदस्य आदी होते.

चंद्राची शितलता..
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे माझ्याकडे आले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारच्यावतीने हा क्रीडा महोत्सव आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या गावाचं नाव जरी चंद्रपूर असलं तरी मे महिन्यात येथे सूर्य आग ओकतो. येथे देशातील सर्वाधिक तापमान असते. पण तरीही या जिल्ह्याचं नाव सूर्यपूर नाही, तर चंद्रपूर आहे. कारण येवढ्या तापमानातही येथे चंद्राची शितलता असते. आणि हीच शितलता तुम्ही येथून घेऊन जावी.

Rajiv Pratap Rudy : सुधीरजींसारखं काम करणारा नेता देशात दुर्मिळच

ऑलम्पिक २०३६..
ऑलम्पिक २०३६ मध्ये मेडल घेणारा खेळाडू माझ्या जिल्ह्याचा असला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे, नव्हे हट्ट आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसें यांना येथील पायाभूत सुविधा दाखवल्या. क्रीडा नगरीचा आणखी विकास करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे खेळाडुंसाठी अधिक चांगल्यात चांगल्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न भविष्यात राहतील, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.