Suicide note written on hand, police officer charged : हातावरच लिहिली सुसाईड नोट, पोलीस अधिकाऱ्यावर आरोप
Satara : जिल्ह्यातील फलटण शहरात एक संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून, मृतदेहाजवळ नव्हे तर थेट तिच्या हातावरच लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलीस प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा थेट उल्लेख केला आहे. या धक्कादायक खुलाशामुळे सातारा जिल्हा पोलिस दल आणि आरोग्य विभाग दोघेही हादरले आहेत.
घटना इतकी गंभीर आहे की, एका डॉक्टरने स्वतःच्या शरीराबरोबरच न्यायव्यवस्थेच्या असंवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. फलटणसारख्या शांत शहरात घडलेल्या या घटनेने केवळ वैद्यकीय क्षेत्रात नव्हे तर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
local body elections : वंचितच्या किल्ल्यावर भाजपचा डोळा, आव्हान पेलवणार?
मृत डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. त्या काळातच त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात तक्रार देत स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करीन.” मात्र त्यांच्या या इशाऱ्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिलं नाही. परिणामी, या दुर्लक्षाचा शेवट त्यांच्या मृत्यूच्या स्वरूपात झाला.
Vidarbha farmers : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत व सरसकट कर्जमाफी द्या
डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट ही फक्त काही शब्दांची नाही, तर ती एका महिलेनं भोगलेल्या वेदनेचा, अपमानाचा आणि असहायतेचा आरडा आहे. सुसाईड नोटमधील शब्द “पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, पोलीस प्रशांत बनकर यांनी सतत मानसिक त्रास दिला” या वाक्यांनी प्रशासनाच्याच संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
डॉक्टरवर झालेल्या या अत्याचाराची माहिती त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर सतत दबावाखाली होत्या. चौकशीचं कारण सांगत त्यांना वारंवार अपमानित करण्यात येत होतं. त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची नोंद वरिष्ठांकडे केली होती, पण त्यांच्या आवाजाला कोणीही ऐकून घेतलं नाही. आज त्याच मौनाचं भयावह रूप आत्महत्येच्या स्वरूपात समोर आलं आहे.
Local Body Elections : सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड, बैठकांचे सत्र!
घटनेनंतर सातारा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हा नोंदवून चौकशी सुरू करण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी थेट बोललो आहे आणि त्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. जर सुसाईड नोट आढळली असेल, तर तिची सत्यता तपासली जाईल. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला निश्चितपणे सोडले जाणार नाही. कठोरात कठोर कारवाई केली जाईल.”
Vidarbha Farmers : ३३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान, अहवाल पाठवून एक महिना झाला!
पण प्रश्न असा आहे की ही कारवाई आता का? जेव्हा डॉक्टरने जिवंत असताना तक्रार केली, तेव्हा कोणी का ऐकलं नाही? एका महिला डॉक्टरला, जी समाजात सेवा देते, तिच्या सन्मानाचं आणि सुरक्षिततेचं रक्षण या व्यवस्थेला करता आलं नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.
फलटणमधील या घटनेने पुन्हा सिद्ध केलं आहे की सत्तेचा गैरवापर आणि व्यवस्थेचं मौन एकत्र आल्यावर न्याय मरतो. आता राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेकडून या प्रकरणात तातडीने आणि पारदर्शक तपास होणं आवश्यक आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे.
____








