Mahayuti is alert on Marathi-Hindi controversy : राज्यातील मराठी-अमराठी वादामुळे महायुती सतर्क
त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय, हा विषय सध्या महाराष्ट्रात चांगलाच गाजत आहे. मराठीच्या मुद्द्यावर सारखीच भूमिका असलेले शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी या प्रश्नावर आवाज उठवला. त्यांनी केलेल्या आक्रमक प्रचारानंतर अनेक मराठी भाषिक लोक ,पक्ष आणि विविध संघटना तसेच मराठीसाठी काम करणारे लेखक कलाकार यावर व्यक्त होऊ लागले. हिंदी हा एक तिसरा पर्याय असा विषय न राहता, तो हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरू झाला. या प्रकरणामुळे सुमारे 19 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे जाहीरपणे एका व्यासपीठावर एकत्र आले.
ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे. मराठीच्या मुद्द्यावर आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजप आणि केंद्रीय नेत्यांना लक्ष केले. राज ठाकरेंचे भाषण संयमित होते तर उद्धव ठाकरे यांनी राजकीय अभिनिवेशात भाषण करत, केंद्र आणि राज्य सरकार विशेषता भाजप आणि एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. मराठी माणसांसाठी आम्ही कायम एकत्र राहू असा संदेश देताना, त्यांनी दोन्ही बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आलो आहोत असे भासवण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होणार? यावर राजकीय आखाडे बांधले जात आहेत. जुन्या निवडणुकीच्या आकड्यांची गोळा बेरीज करत कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा? अश्या पद्धतीने विश्लेषण सुरू झाले. एकनाथ शिंदे गटाला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचा तोटा होऊ शकतो असा एक मुद्दा समोर आला. दरम्यान भाजपने पण ठाकरे बंधूंच्या या भेटीला उत्तर देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी मराठी विरोधी वक्तव्य करत आव्हान दिले आहे.
Sanjay Raut : राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तोंडात बोळा घालून बसलय !
या सगळ्या प्रकारानंतर राज्यात मराठी- अमराठी असा वाद सुरू झाला. सध्या या वादाने जोर पकडला आहे. यातच मनसेने मराठी माणसांचा एक मोर्चा मीरा-भाईंदर परिसरात आयोजित केला होता. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सरकार मराठी विरोधी लोकांना परवानगी देत असून मराठी माणसाची गळचेपी होत आहे. असा आरोप मनसे शिवसेना ठाकरे गट करत आहे. सरकार आपल्या पद्धतीने उत्तर देत आहे पण सरकारचे उत्तर प्रथम दर्शनी या आरोपा ला चोख उत्तर देईल असे दिसत नाही.
Jagdish Gupta : ठाकरे गटाला धक्का माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेत !
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्यापासून राजकीय समीकरणं बदलली आहेत. मराठी-अमराठी वादात ध्रुवीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल का? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. राजकीय युतीच्या बाबतीत राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दोन्ही बंधूंची राजकीय युती होईल यावर जाणकारांचे एकमत नाही. उलट ऐनवेळी जागा वाटपावरून दोन्ही बंधूंच्या वाटा वेगळ्याच राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे राज्यात मराठी विरुद्ध- अ मराठी असा वाद रंगला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीत फटका बसू नये मराठी मताचा फटका बसू नये यासाठी खेळी आखण्यात येत आहे. त्यानुसार, असा वाद पेटला तर भाजपने अमराठी मतांची तयारी करावी तर राष्ट्रवादी यांनी बहुजन आणि पुरोगामी मतांची तयारी करावी तर शिवसेनेनं ठाकरेंच्या वाटेची मराठी मतं आपल्याकडे कशी वळतील याच्यासाठी प्रयत्नशील रहावे. अशी तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये ठरवण्यात आल्याची चर्चा होऊ लागली आहे. या निवडणुका विशिष्ट पक्षाच्या बॅनरवर कमी आणि व्यक्ती विषेशवर जास्त अवलंबून असतात त्यामुळे जिंकणारेच उमेदवार मैदानात द्यावे यावर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची सहमती झाल्याचे समोर येत आहे.