Tiger found dead in Kohaka-Bhanapur : संसर्गामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
Gondia गोंदिया जिल्ह्यातील कोहका-भानापूर परिसरात मंगळवारी, १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एका वाघाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
प्राथमिक तपासात संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृत वाघाचे अवयव पुढील तपासाकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या वाघाचा मृतदेह दासगाव बीट वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०२० आरएफ, गट नं. ३१२ मध्ये आढळला. त्याची ओळख पटविण्यात आली आहे. हा टी-१४ वाघिणीचा अंदाजे २० महिन्यांचा बछडा असल्याचे स्पष्ट झाले. टी-१४ वाघीण आपल्या बछड्यांसोबत नागझिराच्या पूर्व भागात राहत होती. काही दिवसांपूर्वी हा नर वाघ दुसऱ्या मोठ्या नर वाघाच्या भीतीने वेगळ्या क्षेत्रात स्थलांतर झाल्याची माहिती आहे.
Water supply crisis : १५८ गावांमधील नागरिक पाणीपुरवठ्यापासून वंचित!
वाघाचे शवविच्छेदन कुडवा येथील वन विभागाच्या वन उद्यान परिसरात करण्यात आले. पशुधन अधिकारी देवेंद्र कटवे, मेघराज तुलावी, कृपान उईके यांनी शवविच्छेदन केले. त्यात संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. निम वयस्क वाघाला नेमका संसर्ग कशामुळे झाला, हे कळण्यासाठी त्याचे अवयव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
Nana Patole : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचाही जीव घेणार का ?
घटनास्थळी उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, विभागीय वनअधिकारी दक्षता प्रीतमसिंघ कोडापे, सहायक वनसंरक्षक योगेंद्र सिंघ, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, सहायक वनसंरक्षक अपर्णा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक, तहसीलदार श्रीकांत कांबळे, अनिल दशेरिया, मुकुंद धुर्वे, रुपेश निंबार्ते, संतोष श्रीवास्तव वनपाल, पोलिस निरीक्षक ढाले, संजय तेकाम, सेवा संस्थेचे सुशील बहेकार, डीलेश कुसराम उपस्थित होते.