Breaking

Tiranga Yatra : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या शौर्यासाठी बल्लारपूरात तिरंगा यात्रा !

Sudhir Mungantiwar appeals to the public for to pay tribute to the brave soldiers : बल्लारपुरात उद्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी तिरंगा यात्रा

Chandrapur : २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे गोळीबार करून भारतीय पर्यटकांना ठार केले. त्यानंतर १५ दिवसांत ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवादी आणि पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची कामगिरी भारतीय सैन्याने केली. आपल्या सैनिकांच्या सन्मानार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढल्या जात आहे. उद्या (१८ मे) चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्रारपूरमध्ये तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांना साश्रू नमन करण्याची ही ऐतिहासीक संधी आहे. त्यासाठी चला एकत्र येऊया, भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होऊया आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करत देशभक्तीचा जागर करूया, असे भावनिक आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भारत देशाच्या सार्वभौमत्वासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने केलेली अभिमानास्पद शौर्यगाथा भारतासाठी दैदिप्यमान ठरली असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Zilla Parishad Amravati : ३७ महिन्यांपासून झेडपी शिलेदारांची दालने कुलूपबंद!

भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याला अभिवादन करण्यासाठी उद्या सायंकाळी ४ वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेत देशभक्त जनता मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. बल्लारपुर तिरंगा यात्रेचा शुभारंभ काटा गेट येथून होणार आहे. तर समारोप नवीन बसस्थानक परिसरात होणार आहे.

Local Body Elections : दिवाळीपूर्वीच फुटणार झेडपीचे राजकीय फटाके!

तिरंगा यात्रेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक संस्था, विविध सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्ष, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे आणि भारतीय सैन्याचे मनोबल वाढवावे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.