Breaking

Uddhav Thackeray Shiv Sena : शिवसेनेत नव्या दमाच्या नेतृत्वाला प्राधान्य

Dr. Siddharth Deole as Washim District Coordinator : डॉ. सिद्धार्थ देवळे वाशिम जिल्हा समन्वयकपदी

Washim शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वाशिम जिल्ह्यात नव्या नेतृत्वाला संधी देत डॉ. सिद्धार्थ देवळे यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. देवळे यांनी गेल्या दशकभरात वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ठसा उमठवला आहे. २०१९ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून वाशिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत द्वितीय क्रमांकाची मते मिळवली होती. त्यानंतर २०२४ मध्ये वंचित आघाडीतील पश्चिम विदर्भ अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन स्वीकारले होते.

Chhagan Bhujbal returns as minister: भुजबळांच्या निमित्ताने राजकीय पक्षांचे एकत्रीकरण?

त्यानंतर त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून वाशिममधून पुन्हा निवडणूक लढवली व एक लाखांहून अधिक मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यांच्या सक्रिय संपर्क अभियानामुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते स्थानिक पातळीवर ओळखले जात आहेत.

पक्षाच्या अंतर्गत गटबाजी, वाढत्या राजकीय स्पर्धा आणि आगामी निवडणुकांचा विचार करता, शिवसेनेने जिल्ह्यात संघटनात्मक मजबुतीसाठी नव्या दमाच्या आणि अभ्यासू नेत्याला पुढे आणले आहे, असे निरीक्षण राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Maharashtra Politics : भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश, आता नाशिकचे पालकमंत्री कोण? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं..

“पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत संघटन अधिक बळकट करणार,” अशी प्रतिक्रिया डॉ. देवळे यांनी दिली. त्यांच्या नियुक्तीमुळे वाशिम जिल्ह्यात उद्धवसेनेला नवे गतीमान नेतृत्व मिळाले असून, हे नेतृत्व जिल्ह्याच्या राजकारणात नवा टप्पा निर्माण करू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

आगामी निवडणुकाची तयार सुरू
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दिवसात हाेणार आहे़ त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ भाजपनेही जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे़ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही जिल्हा संपर्क प्रमुखाची नियुक्ती केली आहे़