Unfulfilled dream of Dasarwar : दासरवारांचं अपूर्ण स्वप्न मुनगंटीवारांनी केलं पूर्ण !

Sudhir Mungantiwar fulfilled Dasarwar’s dream : शिलाई मशीन घेऊन सुरू केला स्वतःचा व्यवसाय

Chandrapur : जमसमुहाचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. पण लहान – सहान प्रश्नांचीही सोडवणूक करणे हे कसब राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना चांगलेच अवगत आहे. स्वबळावर संघर्ष करणाऱ्या एका महिलेला त्यांनी मदतीचा हात दिला अन् तिने आमदार मुनगंटीवार यांचा विश्वास सार्थ करत स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला.

बल्लारपूर शहराच्या दादाभाई नौरोजी वॉर्ड येथील संगीता विशाल दासरवार यांची ही कहाणी.. संगीता आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत होत्या. पण त्यातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. तुटपुंज्या कमाईमुळे अनेक अडचणींचा सामना त्या करत होत्या. आपल्या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार अडचणीत असलेल्यांना मदत करतात, हे त्यांना ठाऊक होते. पण त्यांच्यापर्यंत संगीता पोहोचल्या नव्हत्या. अखेर त्यांनी आमदार महोदयांची भेट घेण्याचे ठरवले.

Terrorist attack in Pahalgam : भीती, चिंता आणि थरारक अनुभव!

स्वतःची शिलाई मशीन घेऊन आपला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. पण आर्थिक अडचणींमुळे मशीन घेणे शक्य होत नाहीये. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय थाटण्याचे स्वप्न अपूर्ण आहे, अशी आपबिती संगीता यांनी आमदार मुनगंटीवार यांना सांगितली, तसे निवेदनही त्यांनी दिले. आमदार मुनगंटीवार यांनी नेहमीप्रमाणे तात्काळ दखल घेत संगीता दासरवार यांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिली.

Chandrapur Government Medical College and Hospital : मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे बेरोजगार झालेले ४५ सुरक्षा रक्षक झाले कक्ष सेवक !

शिलाई मशीन मिळाल्याने संगीता यांनी आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आमदार मुनगंटीवार यांनी केलेल्या मदतीमुळे माझ्या कुटुंबाला मोठी मदत झाली आहे. आता आम्हाला कुठेतरी आर्थिक स्थैर्य मिळेल, असे संगीता दासरवार यांनी सांगितले. आमदार मुनगंटीवार यांनी आर्थिक संकटात केलेली मदत नवी उमेद आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारी आहे, असे म्हणत त्यांनी आमदार मुनगंटीवार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.