Cases filed against two illegal moneylenders in the city : सहकार विभागाची कारवाई; आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त
Akola अवैध सावकारी प्रकरणी शहरातील गणेश विहार अपार्टमेंट, तुकाराम चौक येथील वर्षा गजानन पिसे आणि गजानन पिसे या दोघांविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे. आणखी दोघांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
दुर्गा हाइट्स, संत तुकाराम चौक येथील अनिता रामराज मौर्य यांच्या तक्रारीवरून सहकार विभागाने छापा टाकला. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ च्या कलम १६ अन्वये ही कारवाई करण्यात आली. सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण एच. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी झाली. सहायक निबंधक अभयकुमार कटके यांनी या प्रकरणातील आर्थिक व्यवहार अवैध सावकारी असल्याचे निष्कर्षात नमूद केले.
Soybean purchasing center : शासकीय सोयाबीन खरेदीवर शेतकऱ्यांना शंका!
धाडसत्रादरम्यान सावकारांकडून आक्षेपार्ह दस्तऐवज, धनादेश आणि नोंदवह्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईसाठी पथकप्रमुख रोहिणी विटणकर, एम. के. विखे, डी. डी. गोपनारायण आणि आर. एम. बौद्रे यांनी सहकार्य केले. या अहवालाच्या आधारे अनिल ए. मनवर यांना उपनिबंधक म्हणून प्राधिकृत करण्यात आले आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ च्या कलम ३९ नुसार खदान पोलिस ठाण्यात २५ मार्च रोजी प्रथमदर्शनी तक्रार दाखल करण्यात आली.
Dr. Sanjay Khadakkar : पश्चिम विदर्भ या क्षेत्रांमध्ये पूर्व विदर्भाच्याही मागे
सहकार विभागाने नागरिकांना अधिकृत परवाना नसलेल्या सावकारांकडून कर्ज घेऊ नये, असे आवाहन केले आहे. अवैध सावकारी प्रकरणी तक्रार करायची असल्यास आवश्यक पुराव्यांसह तालुक्याच्या उपनिबंधक किंवा सहायक निबंधक कार्यालयात अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.
तसेच, कर्जाची गरज असल्यास नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा अधिकृत परवानाधारक सावकारांकडून कर्ज घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.