Vidarbha Farmers : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या!

Demand to declare wet drought in the district : क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Akola जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अकोला जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले.

या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे फुलं-पात्या गळून पडल्याने कापूस पिकाचे नुकसान, तर शेतात पाणी साचल्याने तूर पिके कोमेजली आहेत.

Local Body Elections : सर्कलनिहाय बैठकांचा सपाटा; जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी!

कर्ज काढून पीक लागवडीसाठी खर्च केलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तसेच ही मदत येत्या दसऱ्यापर्यंत जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या वेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.