Farmers’ patience runs out, protest at factory : साखर विकली, पैसे घेतले, पण शेतकऱ्यांची चिंता कायम
Buldhana बुलढाणा तालुक्यातील धाड-वरुड येथील पैनगंगा साखर कारखान्याने विविध जिल्ह्यांतून मोठ्या आश्वासनांनी ऊस मागवून साखर तयार केली, मात्र पाच महिन्यांहून अधिक काळ उलटूनही शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव खान्देश येथील सुमारे ५०० ते ६०० शेतकरी सहभागी झाले होते. कारखान्याने नोव्हेंबर ते मार्चदरम्यान सुमारे १,१५,००० मेट्रिक टन ऊस प्रक्रिया करून साखर विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना एकही हप्ता मिळालेला नाही.
Malkapur administration : रमाई घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत रेती
चेअरमन समाधान डोईफोडे यांचा संपर्क टाळण्याचा प्रकार, फोन न उचलणे व कोणतीही माहिती न देणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. काहींच्या घरात लग्न ठप्प, रुग्णालयातील खर्च अडवले गेले, काहींनी पीकपेरणीसाठी बियाण्याचेही पैसे उधार घेतले असून आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी प्रतिनिधी विकास डाळिंबकर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचा जीव गुदमरतो आहे. ऊस दिला, साखर तयार झाली, पैसे घेतले गेले पण शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही. हा कारखाना कारखाना नाही, तर दरोडेखोरांचा अड्डा वाटतोय.”
कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचेही ६ महिन्यांचे पगार थकीत असून तेही उपासमारीच्या स्थितीत आहेत. यामुळे कारखान्याच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील वर्षी शेतकरी पुन्हा ऊस देतील का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
Transfers of IAS officers : अकोला, बुलढाण्याला मिळाले नवीन पोलीस अधिक्षक!
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जेव्हा आमचे पैसे मिळतील, तेव्हाच कारखाना सोडू. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू.” जिल्ह्यातील कोणताही प्रमुख राजकीय नेता या प्रश्नात पुढे न आल्याने शेतकरी स्वतःच लढा देत आहेत.