Vidarbha Farmers : पीक विमा कंपनीने दिली १९ रुपयांची भरपाई!

Farmers’ sit‑in protest at the crop insurance office : कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या, तुटपुंज्या भरपाईवर संताप

Chikhali शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळालेली तुटपुंजी भरपाई हा शेतकऱ्यांच्या भावनांशी केलेला खेळ असल्याचा आरोप करत चिखली येथील पीक विमा कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले.

पीक विमा कंपनीने १९, ४०, ५२, ६०, ६३, १४८, २९ रुपये इतकी रक्कम भरपाई म्हणून दिल्याचे समोर आले. काहींना पन्नास-साठ रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. “आम्ही लाखो रुपयांचा प्रीमियम भरतो आणि बदल्यात मिळते काही रुपयांची हजेरी,” अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला.

My Kumku My Country : माझं कुंकू – माझा देश’ आंदोलनाची घोषणा !

या निषेधाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी कंपनीकडून मिळालेली रक्कम चिल्लर स्वरूपात परत केली. “अशी मदत नको, आम्हाला आमच्या हक्काचा न्याय द्या,” असे ठणकावून सांगण्यात आले. काही शेतकऱ्यांनी ६ एकर शेतीसाठी एक लाख रुपयांची हानी दाखवली असतानाही मिळालेली रक्कम अत्यल्प असल्याचे दाखवून विमा नियमांची शंका उपस्थित केली.

शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांना सर्व्हे फॉर्म तातडीने उपलब्ध करून द्यावेत.

हेक्टरी किती विमा मंजूर झाला याचे स्पष्ट नियम जाहीर करावेत.

नुकसानभरपाईचे दर पारदर्शक व न्याय्य ठेवावेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “सर्व्हे फॉर्म दिल्यास आम्ही आमची खरी लढाई लढू शकतो. कंपनीचे गोंधळाचे नियम आम्हाला मान्य नाहीत.”

Shashikant Shinde : मित्रपक्षांना बाजूला करण्याची भाजपची रणनीती

या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून, कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आगामी काळात पीक विमा विषयावर राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.