Breaking

Vidarbha farmers : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्मशानभूमीत आंदोलनाचा इशारा

Warning to protest at the cemetery for farmers’ demands : शासनाच्या निष्क्रियतेवर रोष; सातबारा कोरा करण्याची मागणी

Buldhana शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांकडे राज्य शासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १ जुलै राेजी स्मशानभूमीत अन्नत्याग-समाधी आंदोलनाचा इशारा दिला.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरे करणे, पिक विमा त्वरीत वितरित करणे, दुष्काळी अनुदान अंमलबजावणीत आणणे आणि बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यांवर लावलेले ‘होल्ड’ काढण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेने शिरसोडी येथील स्मशानभूमीत आंदोलनाची योजना आखली होती. ही घटना राजकीय दृष्टिकोनातून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चाही घडवून आणत आहे.

प्रशासनाला अडचणीत आणणाऱ्या या आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, आंदोलकांशी संवाद साधला. त्यानंतर संबंधित मागण्यांवर सकारात्मक कारवाईचे आश्वासन देण्यात आले आणि त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Manikrao Kokate : कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली बाळू ठाकरे, रामदास डोसे, गोलू पाटील, पंकज देविकार, योगेश लांजुळकर, दिलीप पाटील, ईश्वर वानखेडे, चक्रधर वानखेडे, निलेश तायडे, चेतन गटमने, सारंग खर्चे, रामदास फरफट, युवराज बोरसे, माणिक अढाव, पुरुषोत्तम भोलवणकर, विशाल मुन्हेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Rajendra Muluk : माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन मागे

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करताना राजकीय आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात नवीन संघर्षाची नांदी देतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.