Vijay Wadettiwar : पहलगाम घटनेचे राजकारण करायचे नाही, पण..!

Vijay Wadettiwar does not want to politicize the Pahalgam incident, but this is an intelligence failure : कठोर कारवाईसाठी आमचा सरकारला पाठींबा

Nagpur : पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये २८ निष्पाप भारतीयांचा जीव गेला. पहलगाम येथे सर्वाधिक पर्यंटक फिरायला जातात. तेथे हल्ला होणे दुर्दैवी आहे. या घटनेचे आम्हाला राजकारण करायचे नाही. पण हे इंटेलिजन्सचे फेल्यूअर आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. या भ्याड हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

२८ मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील अनेक पर्यंटक अजूनही काश्मीर येथे अडकले आहेत. सरकारने त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आम्ही पिडित कुटुंबांच्या पाठीशी आहोत, या हल्ल्याचा तपास झाला पाहिजे. दोषींवर इतकी कठोर कारवाई झाली पाहिजे की पुन्हा भारतावर हल्ला करण्याची दहशतवाद्यांची हिंमत होऊ नये. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी आमचा सरकारला पाठींबा आहे. असेही ते म्हणाले.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘आवाकाडो’ची लागवड !

पहलगाम येथे मोठ्या संख्येने पर्यटक जातात. तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारने ही जबाबदारी पार पाडली नाही. हा भ्याड हल्ला झाला तेव्हा तेथे पोलिस, सैन्याची सुरक्षा नव्हती, हे दुर्दैवी आहे. या हल्ल्याबाबत जी माहिती मिळाली, त्यावरून दोन धर्मांत वाद निर्माण व्हावा, देशात वातावरण दुषीत करण्याचा हल्लेखोरांचा हा प्रयत्न असू शकतो, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Devendra Fadanvis : जागतिक गुणवत्तेचे कृत्रिम अवयव आपल्या देशात !

आपला देश अस्थिर करण्याचा हा कट असू शकतो. त्यामुळे या प्रकरणातील दोषी ज्यांनी हल्लाची जबाबदारी घेतली, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.