Breaking

Vijay Wadettiwar : आता संजीव कुमार राज्यसभेवर जातील की केंद्रात नियुक्तीवर ?

Will Sanjeev Kumar go to Rajya Sabha or be appointed to the Centre? : विजय वडेट्टीवार म्हणतात, तेव्हाच कळेल त्यांची इमानदारी

Nagpur : न्यायालयात प्रकरण असताना संजीव कुमारला बदलण्याची गरज काय होती? त्यांच्या कामात इतकी पारदर्शकता होती, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट का बघितली नाही, असे प्रश्न करत निवडणूक आयोगाच्या खांद्याचा वापर करून भाजपने सर्व निवडणुका जिंकल्या, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

नागपुरात आज (१९ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, भाजप आणि महायुतीच्या विजयात निवडणूक आयोगाचा मोठा वाटा आहे, हे संजीव कुमार यांच्या बदलीवरून सिद्ध होतं. विरोधी पक्ष नेहमी आरोप करतात असे म्हटले जात असेल तर आम्ही आता वाट पाहतोय की, सहा महिन्यांत संजीव कुमार राज्यसभेवर जातात का? की केंद्रात नियुक्तीवर जातात. यावर त्याची इमानदारी कळेल.

Vijay Wadettiwar : ‘विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘कुछ तो गडबड है..’ 

सरकारकडे सध्या प्रचंड बहुमत आहे. पण हे सरकार असं का वागत आहे, हे कळायला मार्ग नाही. या सरकारमध्ये एकवाक्यता का नाही? तीन मुंडीच्या सरकारच्या तिन्ही मुंड्या तीन दिशांना आहेत. यांच्या आपसात कुरघोड्या सुरू आहे. त्यावरच या सरकारचं पतन होईल आणि जनता सरकारला नाकारेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : महाराजांचा चुकीचा इतिहास लिहीणारे आरएसएसचे फॉलोअर !

आरएसएसच्या कार्यालयाबाबत विचारले असता, झोळी घेऊन फिरणाऱ्याला ५ स्टार कार्यालय सगळे सत्तेने दिलेले आहे. सत्ता आल्यावर आनंद देण्यासाठी ती आहे, याचा आनंद असेल आणि 5 स्टार ऑफिसमध्ये बसण्याची सवय पडली असेल तर आरएसएसने प्रगती केली, असे म्हणावे लागेल. पण या दोनशे कोटीचं ऑडिट करून घेतलं का, याचे उत्तर दिलं तर बरं होईल.