Vijay Wadettiwar : राज्य सरकारचे डोके विकृत झाले आहे

Mahayuti Government is playing games with the common people : विजय वडेट्टीवारांचा घणाघात; बहिणींना धोका दिल्याचा आरोप

Nagpur काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेला आरोग्याचे पैसे दिले जात नाही. संजय गांधी निराधार योजना, कंत्राटदार, अंगणवाडी सेविका यांचे पैसे दिले जात नाही. आता लाडक्या बहिणींना निकष लावले आहेत. यावरून सरकारचे डोके विकृत झाले आहे, हे सिद्ध होते. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे देताना निकष लावले जात आहेत. अनेक जाचक अटी घालून बहिणींना पैसे देणेही बंद केले जातील. लाडक्या बहिणींचा अडीच कोटी पर्यंत गेलेला आकडा पंचवीस ते तीस लाखावर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

Local Body Elections : भाजपची तयारी अर्ध्यावर, काँग्रेसची आत्ता सुरूवात !

महाविकास आघाडीचे आमदार फुटणार, महायुतीत सहभागी होणार हा मंत्री उदय सामंत यांचा दावा खोटा ठरला आहे. जुन्या कढीला ऊत देण्याचा कार्यक्रम सरकारचा सुरू आहे. एक्झिट पोलचे भाकीत अनेकदा खोटे ठरले आहे. त्यामुळे दिल्लीतील निवडणुकीतील एक्झिट पोलच्या आकड्यावर विश्वास ठेवू नका असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरीवर फैरी झडत आहे. मात्र सरकारकडून काहीच कारवाई झालेली नाही. मुळात सरकार बेरशरमाचे झाड असल्याची टीका त्यांनी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनात मुंडेचा सहभाग आहे. या प्रकरणात अटक करण्यात आले असलेले आरोप त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते आहेत. त्यांना मंत्रीमंडळातून काढले तर सरकारची इभ्रत जाईल. सरकार भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध होईल या भीतीने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

Kirit Somaiya : अकोल्यात मोठा घोटाळा; बांग्लादेशी-रोहिंग्यांना असे दिले नागरिकत्व !

दमानिया यांनी केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत. मी विरोधीपक्ष नेता असताना घोटाळा उघड केला होता. एक मंत्री भ्रष्टाचार करण्यासाठी सचिव आणि आयुक्तांचा बदल्या करतो. त्यावर पांघरूण घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बदल्यांना मंजुरी दिली होती. धनंजय मुंडेच्या दबाव सरकार चालत होता. भ्रष्टाचार करण्यासाठी त्याला एक प्रकारे मोकळीक दिली होती का, असे प्रश्न आता उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.