Pandit Nehru Never Tried to Extract Gas from Sewers Opposition’s Jibe at Government : सूर्य झाकण्याचा प्रयत्न केल्याने रात्र होत नाही
Nagpur : मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरची ओळख ही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने होती. भारतीय जनता पक्षाला हे नाव आधीपासूनच खटकत होतं. अन् आता त्यांना संधी मिळाली. त्यामुळे त्यांनी तेथील मेट्रो स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर असं ठेवलं. सूर्य झाकण्याचा प्रयत्न केल्याने कधी रात्र होत नाही, अन् कोंबडं झाकून ठेवल्यानं कधी सुर्योदय व्हायचा थांबत नाही, असे म्हणत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली.
यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, ज्यांना स्वतचं कर्तृत्व दाखवता येत नाही, ते इतरांचं नाव पुसण्यातच धन्यता मानतात. पंडित नेहरू यांच्या नावाचा भाजपने घेतलेला धसका आणि दाखवलेला संकुचितपणा त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं द्योतक आहे. पंडित नेहरूंचे योगदान कुणीही पुसू शकत नाही. कारण त्यांनी कधीही नालीतून गॅस शोधला नाही, तर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन इस्त्रोची स्थापना केली. प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे आणि तीच त्यांच्या दूरदृष्टीची खरी साक्ष आहे. म्हणूनच मेट्रो स्थानकाचे नाव नेहरू सायन्स सेंटर करावे, अशी आमची मागणी आहे.
Accepted Member : जिल्हा परिषदेत 5 पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य !
तीन तिघाडा काम बिघाडा..
महायुती सरकारमध्ये एखाद्या योजनेची घोषणा एक पक्ष करतो. दुसऱ्या पक्षाचे अर्थमंत्री त्यासाठी निधी देत नाही. मग ती योजना हळूच गुंडाळून ठेवली जाते. हे सरकार एखादी योजना जनतेसाठी जाहीर करते की मित्र पक्षाच्या इच्छेसाठी, हेच कळत नाही, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जाहीर केलेल्या एक-एक योजना या सरकारने निधी न देता बंद करून टाकल्या. पहीले मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, आनंदाचा शिधा अन् आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनाही गुंडाळणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. महायुतीमधील शितयुद्धाचा फटका जनतेला बसत आहे, असेही ते म्हणाले.