Breaking

Wardha Accident : पोलीस कुटुंबाच्या अंत्यसंस्काराला गहिवरले समाजमन!

 

Public mourn police family’s funeral : बापासह मुलगा, आईसह चिमुकलीवर अंत्यसंस्कार

Wardha मांडगाव येथून राम नवमी उत्सवावरून परत येत असताना, वडनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले बीट जमादार प्रशांत वैद्य यांच्या कारचा सोमवारी मध्यरात्री रानडुकर आडवा आल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांच्यासह पत्नी, दोन चिमुकले ठार झाले. मंगळवारी प्रशांतसह मुलगा प्रियांशला एका चितेवर, तर त्यांची पत्नी प्रियंकासह चिमुरडी माहीला दुसऱ्या चितेवर ठेवून एकाचवेळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

मूळचे मांडगाव येथील रहिवासी असलेले प्रशांत मधुकर वैद्य (४३) पत्नी प्रियंका (३७), मुलगा प्रियांश (८) आणि मुलगी माही (३) यांच्यासह सोमवारी राम नवमीच्या महाप्रसाद कार्यक्रमाकरिता मांडगाव येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते मध्यरात्री कारने (क्र. एमएच ४० केआर ३६०३) वर्ध्याला परत येत होते. तरोडा गावासमोर अचानक कारसमोर रानडुक्कर आडवे आले. त्याला धडक बसल्याने प्रशांतचे कारवरील नियंत्रण सुटले.

Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!

कार समोरून येणाऱ्या टँकरवर (क्र. एमएच ०९ सीव्ही २१८५) आदळली. या भीषण अपघातात प्रशांतची पत्नी प्रियंका आणि मुलगा प्रियांश जागीच ठार झाले. प्रशांत वैद्य आणि चिमुरडी माही गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच लगतचे नागरिक घटनास्थळी दाखल झाले, तसेच जाम येथील महामार्ग पोलिस दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी प्रशांत व चिमुरड्या माहीला तातडीने सेवाग्राम येथे रवाना केले.

Wardha Municipality : खेळाचे मैदान विकासकाला परस्पर सोपवले!

 

मात्र, सेवाग्राम येथे डॉक्टरांनी चिमुकल्या माहीला मृत घोषित केले. प्रशांतला प्राथमिक उपचारानंतर नागपूरला रवाना करण्यात आले. मात्र, प्रशांतचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मंगळवारी दुपारी प्रशांतचा मृतदेह नागपूर येथून आणताना काही काळ मांडगाव येथे नेण्यात आला. तेथील ग्रामस्थांनी त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मृतदेह प्रशांत वैद्य यांच्या वर्धा येथील प्रतापनगर परिसरातील निवासस्थानी आणण्यात आला.

Wardha Mahavitaran : ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना मिळणार स्मार्ट फोन !

दुपारी चौघांचीही अंत्ययात्रा निघाली. यावेळी सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. या दुर्दैवी घटनेने पोलिस विभागातही हळहळ व्यक्त होत आहे. चौघांचेही मृतदेह स्वर्गरथातून मंगळवारी दुपारी वर्ध्याच्या मोक्षधामात नेण्यात आले. तेथे पोलिस दलाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रशांत आणि मुलगा प्रियांश यांचा मृतदेह एका चितेवर ठेवण्यात आला. दुसऱ्या चितेवर प्रियंका आणि चिमुरडी माही यांचा मृतदेह ठेवण्यात आला. दोन्ही चितांना प्रशातंचे ज्येष्ठ बंधू भूषण वैद्य यांनी शोकाकूल वातावरणात भडाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या.