Breaking

Washim Police : १.१५ काेटींची लुटमार, फिर्यादीच झाला आराेपी!

The plaintiff turned out to be the accused : पाच आराेपी गजाआड; पोलिसांचे झाले कौतुक

Washim दाेघांना मारहाण करून एक काेटी १५ लाख रुपये लंपास केल्याची घटना ९ जानेवारी राेजी घडली हाेती. या प्रकरणाचा वाशिम पाेलिसांनी छडा लावला आहे. यामध्ये फिर्यादीच आराेपी निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेय त्याने आपल्यास सहकाऱ्यांसाेबत मिळून लुटमारीचा प्लान केला हाेता. या प्रकरणात पाेलिसांनी पाच आराेपींना अटक केली. वाशिम पोलिसांचे या कारवाईसाठी कौतुक होत आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एक काेटी १० लाख रुपयांचा एवज जप्त कला आहे. बाहेती यांच्या खासगी बाजार समितीमध्ये शेतकरी वर्ग शेतमाल विकावयास आणतो. दररोजची बाजार समितीत कोट्यावधीची उलाढाल होते. शेतकऱ्यांना शेतमालाचे पेमेंट देण्यासाठी बाहेती यांनी नेहमीप्रमाणे आपले नोकर विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बैस यांना एचडीएफसी बँकेत पाठविले. बाहेतींच्या नोकरांनी एचडीएफसी बँकेतून १ कोटी आणि एका व्यापाऱ्याकडुन १५ लाख अशी रक्कम घेतली. ते बाजार समितीमध्ये अंदाजे साय ५.३० च्या दरम्यान निघाले हाेते.

Farmers will now get hi-tech facilities : शेतकऱ्यांना मिळणार आता हायटेक सुविधा !

हिंगोली रोडवरील उडाणपुलाजवळ ते दुचाकीने येत असताना आरोपींनी त्यांना थांबवले. दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम घेऊन पोबारा केला. जखमी हजारे व बैंस यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांना मिळताच त्यांनी आरोपींच्या मागावर पोलिसांना पाठवले. जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी चोवीस तासांच्या आत चार आरोपींना अटक केली.

आरोपी हे वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथील रहिवासी आहेत. विजय इत्ता गोटे, संजय दत्ता गोटे, स्वप्नील पवार, राजु गोटे अशी त्यांची नावे आहेत. दुसऱ्या दिवशी वाशिम पोलिसांनी या प्रकरणातील रुग्णालयामध्ये उपचार करणाऱ्या घटनेतील फिर्यादीला मोठ्या शिताफिने अटक केली. १ कोटी ९५ लाखाची रक्कम घेऊन येणारा विठ्ठल हजारे हा या लुटमार प्रकरणातील महत्वाचा दुवा असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. विठ्ठल हजारे याला पोलिसांनी अटक केली ज्ञानेश्वर बैस याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

CM Devendra Fadnavis 100 days program : जिल्हा परिषदेचे अधिकारी एसीतून बाहेर निघाले

तपास करणाऱ्या पाेलिसांचा सत्कार
जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती लता फड, सहायक पोलिस अधिक्षक नवदिप अग्रवाल, एलसीबी पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, वाशिम शहर ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.