Breaking

YDCC बँकेत काँग्रेसकडून काँग्रेस अध्यक्षांना होणाऱ्या विरोधाचा अर्थ काय ?

The district has one MP in the form of Dhanorkar and one MLA in the form of Balasaheb Mangulkar : जिल्ह्यात धानोरकर यांच्या रूपाने एक खासदार तर बाळासाहेब मांगुळकर यांच्या रूपाने एक आमदार

Yavatmal : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत सध्याच्या स्थितीत बहुमतामध्ये असलेल्या महाविकास आघाडीच्या हातात मनिष पाटील यांच्याकडे अध्यक्षपद आहे. मात्र काँग्रेस संचालकांच्या समर्थनातून अध्यक्ष पाटील यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसच काँग्रेसच्या विरोधात का उभी ठाकली, असा सवाल दाखल अविश्वास प्रस्तावातून पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

या होणाऱ्या विरोधाचा नेमका अर्थ काय लावायचा, अशा संभ्रमात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. मागील दहा वर्षांत जिल्यातील काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी संघर्ष करित आहे. त्यांच्यातील अंतर्गत दरी अजूनही मिटलेली दिसून येत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या ताकदीमुळे नाही तर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे उमेदवार वसंत पुरके, जितेंद्र मोघे, साहेबराव कांबळे यांचा त्यांचा-त्यांच्या मतदारसंघांमध्ये पराभव झाला.

Home minister of Maharashtra: वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारी घटली!

केवळ यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या भक्कम जनाधारामुळे काँग्रेसला वाचविता आली. मांगुळकर हे तळागाळातून, जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले नेतृत्व आहे. यापूर्वीही किर्ती गांधी असो किंवा निलेश पारवेकर यांच्यासारखे आमदार निवडून आणण्यात बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.

२०२४ मध्ये काँग्रेसला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने एक खासदार जिल्ह्याला मिळाला. तर बाळासाहेब मांगुळकर यांच्या रूपाने एक आमदार जिल्ह्यात प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यांच्यासोबतच शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करणाच्या मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपदही काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र मध्यवर्ती बँकेमध्ये काँग्रेस संचालकांची नाराजी उघड झाली आहे. काँग्रेस संचालकांच्या समर्थनातूनच बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील यांच्यावर महायुतीच्या संचालकाकडून अविश्वास प्रसव दाखल करण्यात आला आहे.

Local body elections: पश्चिम विदर्भासाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू

जर अध्यक्षांच्या विरोधात जेष्ठ नेत्यांना अविश्वास प्रस्तावला पाठिंबा दिला असेल तर पक्षात नेते प्रभावहिन झाल्याच्या शंकेला वाव मिळतो आणि जर नेत्याच्या मुकसंमतीने अविश्वासाला साथ दिल्या गेली असेल, तर ती त्यापेक्षाही चिंतेची बाब ठरते. त्यामुळे मनिष पाटील यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाला कॉंग्रेस संचालकांनी दिलेल्या समर्थनाचा नेमका अर्थ काय लावायचा, हे खरे गुढ आहे. विशेष म्हणजे पुढील काळात नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यात काँग्रेसकडून कुठला संदेश दिल्या जात आहे, याचाही विचार काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे.