Zilla Parishad School : ‘आमच्या शाळेला शिक्षक द्या हो,’ विद्यार्थ्यांचे आंदोलन

Students themselves protested for the demands of teachers : ‘शिक्षक द्या, शिक्षक द्या!’ म्हणत सगोडा शाळेतील विद्यार्थी पोहोचले पंचायत समितीत

Sangrampur Buldhana ‘शिक्षक नाहीत, शिक्षण कसे घ्यायचे?’ असा प्रश्न विचारत ग्राम सगोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी बुधवारी थेट पंचायत समितीच्या व्हरांड्यातच शाळा भरवली. हातात फलक घेऊन आणि “शिक्षक द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत त्यांनी शिक्षणाच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली.

या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनालाही जाग आली. गटशिक्षणाधिकारी टाले यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना भेटून “वरिष्ठ पातळीवर शिक्षक मिळाल्यावर सगोडा शाळेला प्राधान्याने शिक्षक देण्यात येईल,” असे लेखी आश्वासन दिले.

Vidarbha Farmers : कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या, नेत्यांकडून सांत्वन

सगोडा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ७ पर्यंत एकूण १३५ विद्यार्थी आहेत. सात वर्गांसाठी केवळ ६ शिक्षक कार्यरत असून, विज्ञान व गणित विषयासाठी पदवीधर शिक्षकाची जागा रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, व्यवस्थापन समितीने यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र, शिक्षक न मिळाल्याने अखेर विद्यार्थ्यांना थेट पंचायत समिती कार्यालयात नेण्याचा निर्णय पालक व शाळा समितीने घेतला.

Samruddhi Mahamarg : समृद्धीच्या अंडरपासमध्ये पावसाचे चिखल, शेतकऱ्यांना त्रास

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश अरबे, उपाध्यक्ष गोपाल हागे यांच्यासह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन आपली व्यथा मांडली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.