10 crore fraud : आठ जणांवर 10 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा !

Raosaheb Danves grandson’s inclusion creates excitement : रावसाहेब दानवे यांच्या नातवाच्या समावेशाने खळबळ

Nashik : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम मुकेश पाटील आणि इतर आठ जणांवर तब्बल 10 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी कैलास अहिरे हे भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष असून सातपूर एमआयडीसी भागात त्यांची एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रा. लि. नावाची कंपनी आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्या वेळी दानवे यांनी कंपनीवरील कर्जाची सेटलमेंट करून देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याबदल्यात कंपनीत 14 टक्के शेअर देण्याची अट ठेवली होती.

Rohit Arya case : आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू,

यानुसार, 25 कोटी रुपयांचा शेअर व्यवहार ठरला. सुरुवातीला अहिरे यांना 14 कोटी 34 लाख 98 हजार रुपये देण्यात आले, मात्र उर्वरित 10 कोटी रुपये न देता कंपनीतील शेअर्स दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या सर्व प्रकारामुळे अहिरे यांनी सातपूर पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली.

Political controversy : ‘निजामालाही ७०० बायका, त्याला काय अर्थ आहे’

या प्रकरणात शिवम मुकेश पाटील (रावसाहेब दानवे यांचा नातू) याच्यासह गिरीश पवार, सतीश अग्रवाल, संजय कतीरा, सुभाष कतीरा, कौस्तुभ लटके, धीरेंद्र प्रसाद आणि मंदार टाकळकर या आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी डमी खात्यांचा वापर करून पैशांचा गैरव्यवहार केला आणि दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली.

Maharashtra politics : महायुतीच्या एक वर्षात फुटकी कवडीही मिळाली नाही !

सातपूर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद घेत पुढील तपास सुरू केला असून, कंपनीच्या शेअर व्यवहारांतील अनियमितता आणि आर्थिक प्रवाहाचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांकडून आर्थिक तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या उद्योगवर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

_____