Misappropriation of government funds worth crores of rupees exposed : शासकीय निधीचा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस
Amravati माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि प्रयोगशाळा सहायक भरतीच्या नावाखाली शासकीय निधीचा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात शिक्षकांपासून ते शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत एकूण १३ व्यक्ती सहभागी आहेत. यात एका प्रभावशाली दलालाचाही समावेश आहे. या घोटाळ्याच्या मूळात अमरावती विभाग असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब संशयास्पद ठरत आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत बोगस शालार्थ आयडी वापरण्यात आल्याने नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली. प्रसारमाध्यमांनी या घोटाळ्याला ‘शालार्थ आयडी घोटाळा’ असे संबोधले असले, तरी वस्तुस्थिती ही केवळ तितकीच मर्यादित नाही. शालार्थ आयडी बनवण्याआधी सात टप्प्यांतून फाईल्स जातात. त्यामुळे हा घोटाळा अनेक पातळ्यांवर रचलेला असून, अत्यंत योजनाबद्ध आहे.
Zilla Parishad : झेडपीची प्रारूप प्रभाग रचना प्रक्रिया पुढील आठवड्यानंतर?
अचलपूर उपविभागात शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेला एक दलाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्वी तो एक सामान्य कर्मचारी होता, मात्र आता त्याची उठबस थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आहे. अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी त्याचा ‘रेट’ तब्बल १० लाख रुपये होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याच्या हस्तक्षेपामुळे अनेक बोगस भरती प्रकरणे यशस्वीपणे पार पडल्याचे बोलले जाते.
Siddharth Kharat : बियाणं, खत, औषधं उधारीवर आणले… सगळंच पाण्यात गेलं
घोटाळ्याचे मूळ केंद्र अमरावती आगे. याच विभागातून राज्यभर शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोरे पसरले. नागपूर, भंडारा, बुलढाणा अशा जिल्ह्यांमध्ये काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असतानाही अमरावती विभाग मात्र कारवाईपासून वंचित राहिला आहे. शासन व प्रशासन यांचा अमरावतीबाबतचा संयम अनेक प्रश्न निर्माण करतो आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शिक्षक संघटनांचे यावर मौन असल्याने जनतेच्या रोषात भर पडत आहे.
Maharashtra Navnirman Sena : चिखलीतील वृक्षतोडीकडे वन विभागाचं दुर्लक्ष
जबाबदार घटक
1. बोगस शिक्षक व प्रयोगशाळा सहायक – बोगस पद्धतीने भरती झालेली व्यक्ती
2. मुख्याध्यापक – अशा उमेदवारांना शाळेत रुजू करून घेणारे
3. संस्थाचालक – नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर करणारे
4. लिपिक – फाईल पुढे चालविणारे
5. कार्यालयीन अधीक्षक – पुढील प्रक्रियेसाठी फाईल ढकलणारे
6. उपशिक्षणाधिकारी व सहायक उपसंचालक – बोगस फाईलवर पुढील कार्यवाही करणारे
7. शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक – भरतीस मान्यता देणारे
8. लिपिक – शालार्थ आयडी चालविणारे
9. कार्यालयीन अधीक्षक – शालार्थ आयडी फाईल पुढे ढकलणारे
10. सहायक उपसंचालक व बोर्ड सचिव – भरतीची फाईल पुढे नेणारे
11. शिक्षण उपसंचालक व बोर्ड अध्यक्ष – शालार्थ आयडी मान्यता देणारे
12. लिपिक – पगारबिलासाठी बोगस आयडीचा वापर करणारे
13. वेतनपथक अधीक्षक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) – वेतन अदा करणारे