Maratha movement : मनोज जरांगेच्या बैठकीला पैशांचा पुरवठा कोण करतो?

Laxman Haakes sensational allegations ; लक्ष्मण हाकेंचा सनसनाटी आरोप, आंदोलना आधीच खळबळ

Mumbai : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक नेते मनोज जरांगे पुन्हा संघर्षाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. २९ ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाची हाक त्यांनी दिली असून, हा मोर्चा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

मोर्चाच्या तयारीसाठी जरांगे पाटील गावोगाव बैठका घेत आहेत. मराठा बांधवांच्या भेटी घेत समर्थन गोळा करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर थेट गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.  हाके यांनी बीड जिल्ह्यातील मांजरसुंभ्यात सुरू असलेल्या जरांगे यांच्या बैठकीवरून तिखट प्रहार केला. “जरांगेंच्या बैठका या सरकार पुरस्कृत आहेत. ही राज्यकर्ते पुरस्कृत झुंडशाही आहे. या बैठकीसाठी एका मतदारसंघातून आमदार १० ते १५ लाख रुपये देतात. म्हणूनच छोट्या छोट्या गावातसुद्धा मोठमोठे बॅनर्स – होर्डिंग्ज दिसत आहेत,” असा गंभीर आरोप हाके यांनी केला.

Urban development : नगरविकास खात्याला मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या !

 

त्यांनी दावा केला की, मराठा समाज ओबीसींमध्ये आरक्षण घेऊन नोकरशाही आणि व्यवस्था आपल्या हातात घ्यायचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मोठे राजकीय खेळ सुरू आहेत. महाराष्ट्रातील कुणाकडूनही आता अपेक्षा नाही. त्यामुळे आम्ही केंद्रातील ओबीसी नेत्यांकडे साकडे घालणार आहोत.

Eknath Shinde : आमदाराच्या आईला हार्ट अटॅक; एकनाथ शिंदेंची तत्परता ठरली जीवनदायी,

हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अमोल मिटकरी यांच्यावरही निशाणा साधला. मिटकरी काही मोठे व्यक्ती नाहीत. त्यांचं बोलणं गांभीर्याने घेण्यासारखं नाही, अशी टीका त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी वारंवार उपोषण करत राज्य सरकारला कोंडीत पकडले.  आता त्यांनी दिलेल्या २९ ऑगस्टच्या मुंबई मोर्चाच्या हाकेनंतर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मात्र, या आंदोलनामागे राजकीय पाठबळ आणि पैशांचा पुरवठा असल्याचा हाकेंचा आरोप राज्याच्या राजकारणात नव्या वादळाला सुरुवात करू शकतो, हे स्पष्ट होत आहे.

_____