Rajendra Shingne : शिंगणे म्हणतात, ‘काँग्रेसविषयी शंका, पण महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही’

Doubts About Congress, But No Alternative to MVA : मेहकरात जनसंवाद कार्यालयाचे उद्घाटन; राजकीय कोट्यांनी गाजला सोहळा

Mehkar जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या जनसंवाद कार्यालयाचा वापर करा. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट गरजेची आहे. शिवसेना (ठाकरे) आणि आम्ही एक आहोत, मात्र काँग्रेसविषयी काहीशी शंका वाटते, असे विधान राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

मेहकर येथील डोणगाव रोडवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात उपस्थित पुढाऱ्यांच्या राजकीय कोट्यांमुळे विशेष रंगत आणली. मेहकर मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. “दिल्लीतील भेटीगाठींपेक्षा स्थानिक समस्यांकडेही लक्ष द्यावे,” असा सल्ला त्यांनी दिला.

Reservation for Panchayat Samiti Chairpersons Announced: पंचायत समित्यांवर येणार महिला राज; १३ पैकी ७ समित्यांचे सभापतीपद राखीव

शिवसेना (ठाकरे गट) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनीही नाव न घेता टोला हाणला. “येथील माजी आमदारांच्या अंगातून अजूनही आमदारकी गेली नाही. कार्यकर्त्यांनी २९ वर्षांचा वनवास भोगला आहे; आता जनतेच्या कामांना प्राधान्य द्या,” असे ते म्हणाले.

Fadanvis On Kharge : प्रियांक खरगेंच्या पत्रावर फडणवीसांचा जोरदार पलटवार !

आमदार खरात म्हणाले, ‘राज्यात शिवसेनेत फूट पडली आणि मेहकरला खरा आमदार मिळाला. पंधरा वर्षे मतदारसंघात खोटा शिक्का खरा चालला होता.’ अतिवृष्टीसाठी जाहीर केलेले पॅकेज “फक्त खडकू ठरले, असा आरोप करत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.