Vidarbha’s irrigation backlog will be eliminated by 2027 : भाजपच्या संवाद मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा दावा
Akola विदर्भातील सिंचनाच्या प्रलंबित प्रकल्पांमुळे निर्माण झालेला अनुशेष २०२७ पर्यंत पूर्णतः संपवला जाईल आणि त्यानंतर कोणताही सिंचन अनुशेष राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात केला. भाजपच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने सिंचन प्रकल्पांच्या मंजुरी, निधी वितरण आणि कामाच्या प्रगतीसाठी गतिमान योजना हाती घेतल्या आहेत. “२०१४ पूर्वीच्या तुलनेत आता सिंचनासाठी निधीच्या वाटपाची गती आणि पारदर्शकता वाढली आहे. २०२७ पर्यंत विदर्भात पाणी टंचाईमुळे कोणताही शेतकरी पिकशेतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
Maharashtra Navnirman Sena : महापालिकेच्या झोन कार्यालयात मटण मार्केट लावू, मनसेचा इशारा
या संवाद मेळाव्यात शेतकरी, व्यावसायिक, महिला बचतगट व विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, “डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा मोफत सौरऊर्जा पुरविण्यात येणार आहे. यामुळे शेतीवरील वीज खर्च कमी होऊन शेती अधिक शाश्वत आणि लाभदायक होईल.”
फडणवीस यांनी आपल्या भाषणात अमरावती विभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. अमरावती विमानतळ सुरू झाल्यानंतर आता अकोला जिल्ह्याचा क्रमांक लागतो. अकोला येथील शिवणी विमानतळावरून निश्चितच उड्डाण होईल. या संदर्भात प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच सकारात्मक घडामोडी घडतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Zilla Parishad : पेन्शन अदालतमध्ये अधिकारीच नसतात, कोण निर्णय देणार?
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे विदर्भातील शेतकरी, नागरिक व स्थानिक प्रतिनिधींमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन अनुशेष, वीजपुरवठा आणि दळणवळणाच्या सुविधांबाबत प्रलंबित असलेल्या मागण्यांना या घोषणांमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.