Constitutional Provisions Brought Tribals, Nomadic Communities Into Mainstream : भिगवण पुणे येथे राज्यस्तरीय पारधी न्याय हक्क समरसता परिषद
Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आदिवासी, भटके व मागासवर्गीय समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकला, असे प्रतिपादन अनुसूचित जाती आयोग, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले. पारधी समाजाच्या न्याय व हक्कांसाठी आयोजित राज्यस्तरीय पारधी न्याय हक्क समरसता संमेलनात बोलताना त्यांनी हजारो पारधी बांधवांसमोर हे वक्तव्य केले. हे संमेलन भिगवण पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. पारधी समाजाच्या विविध समस्या आणि हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचा संदेश त्यांनी दिला.
अॅड. मेश्राम म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे आणि संविधानातील तरतुदींमुळे आदिवासी, भटके व मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात स्थान मिळाले आहे. पारधी समाजासारख्या आदिवासी भटक्या जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मात्र, अजूनही अनेक आव्हाने आहेत, जसे की शिक्षण, रोजगार, निवास आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत. या संमेलनामुळे पारधी बांधव एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करू शकतील.” ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना पारधी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग विशेष प्रयत्न करत आहे.
PWD Contractor Commits Suicide : पी. व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे !
संमेलनात पारधी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी भाग घेतला आहे. न्याय हक्कांसाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आले. अॅड. मेश्राम यांनी पारधी समाजाच्या युवकांना शिक्षण आणि उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. हे संमेलन भाजप आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. पारधी समाजाचे आदिवासी सेवक बबन गोरामन यांनी सांगितले की, हे संमेलन एक मैलाचा दगड ठरेल आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अॅड. मेश्राम यांच्या नेतृत्वात आयोग राज्यात पारधी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.