Over 21,000 farmers are still deprived of crop insurance : एक हजारांहून अधिक शेतकरी अजूनही पीकविम्यापासून वंचित!
Jalgao Jamod तालुक्यातील तब्बल २१,३९९ शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित असल्याने शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्वरित जमा न झाल्यास १ ऑक्टोबरपासून कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला.
माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये एकूण २६,५६१ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला. यापैकी ४,०७४ शेतकऱ्यांना आधीच ७.७३ कोटींचे वाटप झाले आहे. तर, २ सप्टेंबर २०२५ रोजी फक्त १,०८८ शेतकऱ्यांना २.५५ कोटी रुपये वितरित करण्यात आले. परिणामी, अजूनही २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना १७.२७ कोटी रुपयांचा लाभ मिळालेला नाही.
Maratha Reservation : ओबीसी आरक्षणावर गदा घालणारा शासन निर्णय रद्द करा!
शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा प्रीमियम वसूल करून विमा कंपन्या आणि शासन मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. “३० सप्टेंबरपर्यंत सर्वांना विम्याची रक्कम मिळाली नाही, तर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते व शेतकरी मिळून उपोषण उभारतील,” असा इशारा तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांनी दिला.
आंदोलनात जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भीमराव पाटील, शहरप्रमुख रमेश ताडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले.
राजकीय जाणकारांच्या मते, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविमा प्रश्नावर ठाकरे सेना आक्रमक झाली असून, सरकार आणि विमा कंपन्यांविरोधात लढाई तीव्र होण्याची शक्यता आहे.