Is Ajit Pawar a minister of one community Prakash Shendges question : अजित पवार केवळ एका समाजाचेच मंत्री आहेत का?” प्रकाश शेंडगे यांचा सवाल
Mumbai : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. दसऱ्यानंतर मुंबईत ओबीसी समाजाकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा मोर्चा ८ किंवा ९ ऑक्टोबरला निघेल, अशी माहिती मिळते. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
“अजित पवार अर्थमंत्री म्हणून तीन वर्षांपासून खजिन्याची चावी सांभाळत आहेत. या काळात त्यांनी मराठा समाजाला तब्बल २५ हजार कोटी दिले. मात्र, गेल्या २५ वर्षांत ओबीसी समाजाला फक्त अडीच हजार कोटी मिळाले. अजित पवार केवळ एका समाजाचेच मंत्री आहेत का?” असा थेट सवाल शेंडगे यांनी केला.
Maratha reservation : खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिलं तर औचित्य संपेल
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीचा जीआर काढला. यामुळे ओबीसी समाज संतप्त असून, दसऱ्यानंतर मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. शेंडगे म्हणाले, “आज ऑनलाइन बैठक घेतली जात आहे. राज्यभरातील पदाधिकारी यात सहभागी होत आहेत. या बैठकीतच मोर्चाची तारीख निश्चित होईल. शक्यता ८ किंवा ९ ऑक्टोबरची आहे.”
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी “मोर्चाचा अजेंडा स्पष्ट केला पाहिजे” अशी भूमिका घेतल्यावर शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली. “तायवाडे यांची ही भूमिका नवी नाही. ‘सगे सोयरे’च्या निर्णयावेळीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती. आता वेगवेगळ्या भूमिका मांडण्याऐवजी सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र यायला हवे,” असे शेंडगे म्हणाले.
Warning of a ‘lockout’ protest : मेहकर नगरपरिषदेविरोधात संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
“महामोर्च्याचे आम्ही स्वागत करतो, पण अजेंडा नेमका काय आहे हे स्पष्ट केले पाहिजे. नवीन शासन आदेशामुळे ओबीसी समाजाचे नेमके नुकसान कसे होत आहे, हे सरकारसमोर मांडावे. आयोजकांची भूमिका समाजहिताची असेल, तर आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात सहभागी होऊ,” अशी भूमिका तायवाडे यांनी व्यक्त केली. तसेच, “मंत्रिमंडळाच्या उपसमितीत छगन भुजबळ यांनी आक्षेप स्पष्टपणे मांडले का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मराठा आंदोलनानंतर ओबीसींचा महामोर्चा होणार असून, आगामी काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
_____