Dont support, Rohit Pawars reply to Bhujbal Supriya Sule also comment. : समर्थन करू नका, रोहित पवारांचे भुजबळांना उत्तर सुप्रिया सुळे यांचाही टोला
Ahilyanagar : अंतरवालीतील लाठीचार्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फटकारले आहे. “अंतरवालीत लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आदेश कुणी दिला हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी त्याने लाठीचार्जचं समर्थन करू नये,” असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांनी आंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना जबाबदार धरले होते. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “कदाचित भुजबळ यांचा अभ्यास कच्चा आहे. पोलिस केवळ गृहमंत्र्यांच्याच आदेशाने कारवाई करतात. त्यामुळे या घटनेवर कुणीही राजकारण करू नये.”
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर नवा प्रहार, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुसर !
अंतरवालीतील आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत ८३ पोलीस जखमी झाले होते. या दगडफेकीचे नियोजन आदल्या रात्री झाले आणि त्यात शरद पवार गटाचा एक आमदार सहभागी होता, असा आरोप भुजबळांनी केला होता. त्या आमदाराला आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत केलं होतं, असंही ते म्हणाले.
Ajit Pawar : अजित पवारांचा इशारा मंत्रिपदासाठी कामगिरी दाखवा !
यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही तीव्र आक्षेप घेतला. “भुजबळांबद्दल आदर आहे, पण त्यांचे आरोप निराधार आहेत. पुरावा कुठे आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर “आम्ही भुजबळांबद्दल बोलणार नाही, कारण त्यांची जेलवारी सर्वांना ठाऊक आहे” असे म्हणत त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत टोलाही लगावला.
दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “लाठीचार्जच्या आदल्या रात्री दोन वाजता आमदारांची बैठक झाली होती. त्यानंतर महिला पोलिसांवर तुफान दगडफेक झाली, पोलिस घरोघरी लपत होते. मात्र, दगडफेकीमागे पवार आहेत असं मी कधीही म्हटलं नाही,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
अंतरवाली प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचा सिलसिला आता आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.
_____