Indefinite hunger strike suspended : आक्रोश सभेनंतर चारही उपोषणकर्त्यांचा निर्णय
Akola महाराष्ट्र राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, अकोला येथील ओबीसी समाजाने तीव्र आंदोलन सुरू केले. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून पाच प्रतिनिधींनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला जिल्हाभरातून पाठींबा मिळत असल्यामुळे तब्बल 10 दिवस हे आंदोलन चालले अखेर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी मंत्री सुधाकर गणगणे यांच्या हस्ते त्या चारही उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण स्थगित केले.
जनार्दन हिरळकर, शंकर बापूराव पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश माणिकराव ढोमणे आणि ॲड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशिकर. यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात प्रवेश देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणे. यासाठी उपोषण सुरु केले होते. त्यांना विविध संघटना आणि गावागावांतून पाठिंब्याची पत्रे येत होते. आज ओबीसी समाजाने आक्रोश सभा आयोजित केली होती.
Banjara community : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर
या सभेनंतर माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार हरिदास भदे , विजयराव कोसल, प्रा डॉ संतोष हुशे, सुभाष सातव, सदाशिव शेळके, एड.प्रकाश दाते, प्रा विजय उजवणे, चंदू सावजी, अनिल शिंदे, विष्णू मेहरे, नंदू बोपूलकर, गणेश इंगोले, सुमित्राताई निखाडे, अर्चनाताई धनोकार, मायाताई इरतकर, श्रीराम पालकर, डॉ शंकरराव सांगळे, गणेशराव वाडतकर, गणेश पाडसुलकर, संतोष सरोदे,श्रावण धारपवार, भानुदास नंदाने, अरविंद महाले, नरेंद्र लखाडे, बबनराव उबाळे, डॉ सुरेश बच्चे, दादाराव सुलताने आदींच्या उपस्थितीमध्ये आंदोलन स्थगित करून उपोषण कर्ते यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.