Mahatma Gandhi Shed the Suit, Devoted His Life to India in a Simple Dhoti : महात्मा गांधींनी सुटबुट काढून फेकला अन् देशासाठी पंचावर आयुष्य खर्ची घातले
Sevagram – Wardha : भारतात सुटबुटात आलेले गांधी भारतातील अवस्था बघून सुटबूट काढून फेकतात आणि पंचा नेसतात. अन् त्याच पंचावर आयुष्य खर्ची घालून या देशाला स्वातंत्र मिळवून देतात. हे समर्पण ‘त्या’ लोकांना कधीतरी जमणार आहे का? १५ कोटी रुपयांचा सुट घालणाऱ्याला त्याग समजणार आहे का, असे खोचक प्रश्न काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता केले.
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे आज (२ ऑक्टोबर) संविधान पदयात्रेचा समारोप आहे. त्या कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, दिवसातून चार वेळा सुट बदलणारा व्यक्ती बलीदानाच्या गोष्टी सांगतो. हा देश वाचवायचा असेल, धर्मांधता संपवायची असेल तर संविधानाचे रक्षण करणे गरजेचे आहे. आजचा दिवस महात्मा गांधींच्या जयंतीचा दिवस. १०० वर्षांचाही मोठा योगायोग आला आहे. आज दसरा, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन, गांधीजींच्या जयंतीचा दिवस आणि आरएसएसचेही १०० वर्ष आजच पूर्ण झाले. आज त्यांना शंभरावी साजरी करू द्या, कारण त्यांच्या पापाचा घडा भरला आहे.
America in chaos : टॅरिफचा दबाव आणणाऱ्या अमेरिके मोठा हाहा:कार !
केवळ जातीय द्वेश पसरवून स्वतःच्या खुर्च्या त्यांना टिकवायच्या आहेत. शेतकऱ्यांची, बेरोजगारांची व्यथा ऐकायला कुणी नाही. या देशावर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवलेले आहे. ज्यांनी या संघावर बंदी घातली, त्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वाच उंच उभारला. ही वेळ त्यांच्यावर आली आहे. गांधीजींचे नाव घ्यावेच लागते, हा त्यांचा पराभव आहे. इंग्रजांचे पाय चाटणारे हे लोक, स्वतःच्या मुख्यालयावर देशाचा झेंडा लावत नाहीत. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांचे रक्त सांडले आहे, त्यांच्या पूर्वजांचे नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला बलीदान शिकवण्याची गरज नाही, असे म्हणत वडेट्टीवार यांनी आरएसएस आणि भाजपवर तोफ डागली.
duasehra melava : त्यांना हिंदू संस्कृती माहिती नाही, चिखलात लोळवायलाच हवं
हे सरकार शेतकऱ्यांना नाही तर अदानीला मदत करणारे आहे. आपल्या सुरक्षेचे कवच म्हणजे आपले संविधान आहे. हे कवच कायम ठेवण्यासाठी आपण आज लढा दिला पाहिजे. नाहीतर ज्या दिवशी हे कवच निघून जाईल, त्या दिवशी आपल्याला स्वतंत्र भारताचे गुलाम बनून जगावे लागेल. त्यांच्या दयेवर जगावे लागणार आहे, अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. १० ऑक्टोबरच्या ओबीसी मोर्चाची तयारी जोरात सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.