Shivsena Stages Sit-in Protest at District Office : अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात अमरावती, चांदूर बाजार आणि मोर्शीत आक्रोश
Amravati अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे नेते व खासदार अरविंद सावंत यांनी केले. याच पार्श्वभूमीवर चांदूर बाजार येथे ‘हंबरडा मोर्चा’, तर मोर्शी येथे ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
आंदोलनादरम्यान राज्य सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या —
राज्याने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.
पंतप्रधान पीक विमा योजनेतील अटी रद्द करून सरसकट विमा संरक्षण द्यावे.
गरजू घरकुलधारकांना तत्काळ मंजुरी देऊन लाभ देण्यात यावा.
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेंतील लाभार्थ्यांना मेडिकल दाखल्यावर वयाचा पुरावा ग्राह्य धरणे.
अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करणे.
Draft Voter List Published : प्रारूप मतदार यादी जाहीर; आक्षेप नोंदविण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत
या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह संबंधित तहसीलदारांना देण्यात आले.
अमरावतीतील आंदोलनात आमदार गजानन लवटे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, मनोज कडू, नरेंद्र पडोळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, विजय ठाकरे, महेंद्र दिप्टे, प्रदीप अनोकार, विलास चोपडे, रामा सोळंके, मनीषा टेंभरे, ज्योती औघड, सृष्टी वाघमारे, प्रतिभा बोपशेट्टी, कपिल देशमुख, प्रवीण हरमकर, डॉ. निर्मळ, राजू अकोटकर, अनिल सोनटक्के आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि शेतकरी सहभागी झाले होते.
OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नको, जातीय जनगणना करा!’
मोर्शी येथील आक्रोश मोर्चात प्रफुल्ल भोजने (उपजिल्हाप्रमुख), दत्ता ढोमणे (तालुकाप्रमुख), ओंकार काळे, घनश्याम सिंगरवाडे, अनिता पल्हाड, क्रांती चौधरी, संदीप भोयर, उमेश शहाणे, विजय कनेरकर, अमोल गुल्हाने, नीलेश चिखले, सुरेश विटाळकर, रवींद्र बुरंगे, नरेश वानखडे, गोलू जैस्वाल आदींसह शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.