Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री म्हणाले, कर्जमाफी होणारच; बच्चू कडू म्हणतात मुहूर्त शोधताय का?

Chandrashekhar Bawankule said, loan waiver will happen; Bachchu Kadu says are you looking for a good Time : शेतकऱ्यांत संताप, विरोधकांकडून टीकेचा भडिमार

Amravati : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून दिलेल्या आश्वासनावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना महसूलमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, “कर्जमाफीचा संकल्प आम्ही निवडणुकीदरम्यान केला आहे आणि तो नक्कीच पूर्ण करू,” असे स्पष्ट केले. “योग्य वेळी ही कर्जमाफी केली जाईल,” असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या विधानावर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “कर्जमाफीसाठी कोणाकडून मुहूर्त शोधताय का?” असा सवाल करत त्यांनी टोला लगावला. सरकारकडे निधी नसल्यास पैसे कुठून आणायचे, हे आम्ही दाखवू, असेही ते म्हणाले. “राज्यातील एका कंपनीने पाच वर्षांसाठी एक लाख कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे आणि हा निधी बिनव्याजी असेल,” असा दावा कडू यांनी केला.

Lord Shri Ram : अकोल्यातून ८३४ जेष्ठ नागरिकांची विशेष तीर्थ रेल्वे !

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारची नीयतच साफ नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. “आमदारांच्या घरासमोर आणि नाशिकमध्ये कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्यात येईल,” अशी घोषणा त्यांनी केली.

“निवडणुकीपूर्वी रामाची शपथ घेऊन कर्जमाफीचे आश्वासन देणारे आता सत्ता आल्यावर कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत?” असा सवाल करत, “तोच राम आता तुमच्यावर कोपणार आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली.

Swimming pool : जलतरण तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू !

सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कर्जमाफीचा निर्णय घेण्याची घोषणा केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर अद्याप निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण असून, विरोधकांकडून टीकेचा भडिमार सुरू आहे.