Chandrashekhar Bawankule : मंडळ अधिकाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर फौजदारी कारवाई निश्चित !

If Akola division officer found responsible, criminal action will follow : विभागीय आयुक्तांना चौकशी करायला लावणार

Nagpur : अकोला जिल्ह्यातील एक मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन यांनी व इतर काही लोकांनी आपल्या शेतात बांध घातला. त्यामुळे परिसरातील जवळपास ५० ते ६० शेतकऱ्यांची ३०० एकर शेती पाण्याखाली आली आहे. याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. पण या प्रकरणाचे तपास अधिकारी स्वतः हेच मंडळ अधिकारी आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान याच मंडळ अधिकाऱ्यामुळे झाले असेल तर त्याच्यावर निश्चितपणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात महसूल मंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी आज (२५ सप्टेंबर) सकाळीच बातमी पाहिली. ती शेतकऱ्यांची व्यथा आहे. मी स्वतः विभागीय आयुक्तांना चौकशी करायला लावणार आहे. मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, तर हा मोठा गुन्हा आहे. यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. आमच्या खात्यात बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठलाही वाव नाही.

Heavy rains cause damage : विजय वडेट्टीवारांच्या आवाहनाला चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद !

राज्यातील नुकसानाचा आकडा केंद्र सरकारकडे जात असतो. केंद्र सरकारही मदत करते. राज्यावर सध्या विपरीत परिस्थिती आली आहे. पण यातून सरकार मार्ग काढत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेतला. यावरून नाईक आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. यासंदर्भात विचारले असता, गणेश नाईक जबाबदार नेते आहेत. यासंदर्भात गणेश नाईक यांच्याशी बोलल्यानंतरच काहीतरी सांगता येईल, असे ते म्हणाले.

Heavy Rains : ..तर मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरक्षणाबाबच्या वक्तव्याबाबत विचारले असता, एससी व एसटीचे आरक्षण कायम ठेऊन म्हणजेच टक्केवारी कायम ठेऊन समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना लाभ देण्याची कदाचित त्यांची सुचना असावी. एससी आणि एसटी समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना लाभ मिळावा, अशीच त्यांची भावना असावी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.