Breaking

Devendra Fadnavis : काय सांगता! ‘देवाभाऊ’च्या नावाने चक्क पतसंस्था?

Devabhau Ladki Bhahin Women’s Urban Cooperative Credit Society inaugurated : देवाभाऊ लाडकी बहीण महिला पतसंस्थेचे बावनकुळेंच्या हस्ते उद्घाटन

Chikhli विधानसभा निवडणुकीत ‘देवाभाऊ’ हे नाव चांगलेच गाजले. देवेंद्र फडणवीस यांचे ब्रांडींग या नावाने करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राबाहेरील नेतेही त्यांना देवाभाऊ म्हणायला लागले. पण या नावाने एक पतसंस्था सुरू होईल, याचा कुणी विचारही केला नव्हता. केवळ देवाभाऊच नव्हे तर लाडकी बहीण या दोन शब्दांचाही या पतसंस्थेच्या नावात समावेश आहे.

चिखली तालुक्यातील देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश फुंडकरस संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराव शिंदे यांचीही उपस्थिती होती.

Ramdas Athavle meets PM Modi : आठवलेंची थेट मोदींना मागणी, ‘महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या!’

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थांची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी अशा संस्थांची गरज अधोरेखित केली. महिलांना आर्थिक व्यवहारात सक्षम बनविण्यासाठी पतसंस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. देवाभाऊ लाडकी बहिण पतसंस्थामुळे स्वयंरोजगार व बचत संस्कृती बळकट करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. या पतसंस्थेच्या राज्यभर शाखा उभारून लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या साक्षर व सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar : “कुणी आडवे आले तर खपवून घेणार नाही”

ते पुढे म्हणाले, शासन गोरगरीब, शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी काम करत आहे. लाडक्या बहिणींना दरमहा १,५०० रुपये दिले जात आहेत, शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे, लवकरच समितीचे सर्व्हेक्षण पूर्ण करून गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. स्वस्तात शेतजमीन मोजणी, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे अल्पदरात उपलब्ध करणे, नकाशा योजनेद्वारे प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजना, पाणंद रस्ता, तुकडेबंदी कायदा रद्द करणे असे ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतले आहेत.