Breaking

Forest Department : वन्यजीव संरक्षणासाठी ‘तिसरा डोळा’!

140 automatic cameras in Ambabarwa Sanctuary : अंबाबरवा अभयारण्यात १४० स्वयंचलित कॅमेरे

Khamgao अंबाबरवा अभयारण्यात वाघ आणि अन्य वन्यजीवांची अचूक संख्या निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी १४० स्वयंचलित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. १३ फेब्रुवारीपासून १७ मार्चपर्यंत हे कॅमेरे कार्यान्वित राहणार आहेत. वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

या अभियानासाठी वसाली येथील गार्डनमध्ये ६५ वनकर्मचाऱ्यांना देहरादून येथील तज्ज्ञांकडून ४ जानेवारीला प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणात सोनाळा वनपरिक्षेत्रातील २५, धूळघाट वनपरिक्षेत्रातील २० आणि वाण परिक्षेत्रातील २० कर्मचारी सहभागी झाले होते.

Devendra Fadanvis : ‘फिक्सर’ लोकांना अजिबात मान्यता देणार नाही !

अभयारण्यात १९ बीट तयार करून ७० ग्रीडमध्ये हे ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. ३३ दिवसांच्या निरीक्षणानंतर संकलित डेटा पुढील विश्लेषणासाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट, देहरादून येथे पाठविण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे वाघ आणि अन्य वन्यजीवांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवता येणार असून, त्यांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाय करता येतील.

अंबाबरवा अभयारण्य सोनाळा वनपरिक्षेत्राअंतर्गत असून, ते १५,८३९.७५ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रानम्हशी, तडस, माकड, कोल्हा, खवले मांजर, रानकुत्रा आणि अन्य वन्यजीवांसह विविध दुर्मीळ पशुपक्षी आणि वनस्पती आढळतात. तसेच, साग, अर्जुन, बेल, तेंदू, बांबू, पिंपळ, पळस अशा असंख्य वृक्षसंपदेने हे जंगल समृद्ध आहे.

Central Government : डाव्या संघटनांचे २५ कोटी कामगार उतरणार रस्त्यावर!

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट उपवनसंरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोनाळा, वान, धारगड, सोमठाणा, नरनाळा या अभयारण्यांमध्येही १३ फेब्रुवारीपासून ५८० स्वयंचलित ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात वन्यजीव निरीक्षणाची प्रभावी यंत्रणा उभारली गेली आहे.