All-party protest at Tehsil office : महिलेच्या शेतात सरकारचे बांधकाम, तहसील कार्यालयावर सर्वपक्षीयांचा मोर्चा,
Sindkhedraja राजमाता जिजाऊंच्या भूमीत एका महिला शेतकऱ्याच्या शेतीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वसूचना न देता कब्जा घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे. कमलबाई माने यांच्या शेतातील उभी पिके व ५ लाखांचे कुंपण जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात शहरातील सर्वपक्षीय व सर्व समाजघटकांचे नागरिक एकत्र येत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार अजित दिवटे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
कमलबाई माने यांच्या मालकीच्या सर्व्हे नं. ३७, ३८, ३९ मधील शेतीचा ताबा कोणतीही नोटीस न देता घेतला गेला. पिकांचे (सोयाबीन, भुईमूग, उडीद) अंदाजे १० लाखांचे नुकसान झाले असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करावा, नुकसानभरपाई द्यावी, तसेच ताबा परत द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Sharap Pawar NCP : अवैध सावकारांना पोलिसांचे संरक्षण, राष्ट्रवादीचा आरोप
निवेदनात पुढे म्हटले आहे की, बांधकाम विभागाला कोणत्या कागदपत्रांच्या आधारे परवानगी दिली, त्याची प्रत द्यावी. मराठा सेवा संघाला हीच जमीन १०० वर्षांच्या लीजवर दिल्याची माहिती असून, त्याबाबतचा बॉण्ड, रक्कम व पावत्यांची माहितीही तात्काळ द्यावी.
कमलबाई माने यांनी इशारा दिला की, “१४ ऑगस्टपर्यंत न्याय मिळाला नाही, ताबा परत मिळाला नाही आणि नुकसानभरपाई दिली नाही, तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करू.”
Uddhav Balasaheb Thackeray : रमी खेळणाऱ्या, अघोरी पूजा करणाऱ्या मंत्र्यांना हाकला
या मोर्चात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ ठाकरे, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, जिल्हा सरचिटणीस विजय तायडे, भाजप युवा नेते अशोक मेहेत्रे, नगरपरिषद बांधकाम सभापती गणेश झोरे, माजी सभापती भिवसन ठाकरे, भाजप शहराध्यक्ष अॅड. संदीप मेहेत्रे, विविध सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसेवा सोसायटी पदाधिकारी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.