GR issued but not implemented; 7 months’ honorarium pending : शासनाला मानधन परिपत्रकाचा विसर; ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन
Khamgao महायुती सरकारने स्वतःच काढलेल्या जी.आर.ची अंमलबजावणी न केल्याने ग्रामरोजगार सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. शासनाने ८ हजार रुपये मानधन आणि २ हजार रुपये प्रवास व अल्पोहार भत्ता देण्याचा निर्णय घेत एक वर्ष उलटले, मात्र आजपर्यंत तो अमलात आला नाही. उलट सात महिन्यांचे मानधनही थकविल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने ३ ऑक्टोबर रोजी खामगाव येथे एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा संपर्क प्रमुख ज्योतीराव इंगळे यांनी केले.
Local Body Election : पहिले नगर परिषद, नंतर जिल्हा परिषद निवडणूक
तत्कालीन महायुती सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना ८,००० रुपये मानधन आणि २,००० रुपये प्रवास व अल्पोहार भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, आजवर या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. उलट मार्च ते सप्टेंबर २०२५ या सात महिन्यांचे मानधन थकविल्याने ग्रामरोजगार सहाय्यकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, “ग्रामरोजगार सहाय्यक हा शासन आणि मजूर लाभार्थी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. अशा घटकांवरच शासनाने अन्याय करणे म्हणजे ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेलाच धोका पोहोचविणे होय.”
Cyber security : तिसरीपासूनच शालेय स्तरावर सायबर सुरक्षा शिक्षण !
या कामबंद आंदोलनात खामगाव तालुका अध्यक्ष मिलिंद शिरसाट, उपाध्यक्ष जितेंद्र परमार, सचिव अविनाश कुटे, अनिल वाकोडे, महादेव पांडे यांच्यासह शेकडो ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाने तातडीने थकबाकी मानधन वितरित करावे व परिपत्रकाची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
Congress Levels Charges Against Ruling Front : मतांची चोरी सापडली, पण चोर अद्यापही फरार !
एकनाथ शिंदे–देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घोषणा केल्यानंतरही अंमलबजावणी न केल्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यकांचा प्रश्न राजकीय व सामाजिक दोन्ही स्तरांवर गाजत आहे. राज्यभरातील हजारो ग्रामरोजगार सहाय्यक आता अनिश्चितकालीन आंदोलनाच्या तयारीत असल्याचे संघटनेच्या सूत्रांकडून समजते.