Negligence by Administration and Police Towards Illegal Sand Extraction : वाळू माफियांचा दिवाळीचा धंदा, महसूल-पोलिस यंत्रणा मूकदर्शक
Buldhana दिवाळीच्या सणात संपूर्ण जिल्हा उजळलेला असताना, बुलढाणा शहर मात्र वाळू माफियांच्या कारवायांनी गढून गेले आहे. रात्रीच्या अंधारात वाळूचे अवैधरित्या उपसा करून शहरात ढिगारे तयार केले जातात आणि पहाटेच्या आधीच ही वाळू विक्रीसाठी गायब केली जाते. जिल्हा मुख्यालयातच अशी उघडपणे सुरू असलेली वाळूची तस्करी महसूल आणि पोलिस प्रशासनाला थेट आव्हान देणारी ठरत आहे.
वाळू घाटांचे लिलाव अद्याप न झाल्याने वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी असतानाही, बुलढाण्यात वाळू माफियांचा धंदा तेजीत आहे. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने कारवाया केल्या असल्या तरी त्याचा कोणताही प्रतिबंधात्मक परिणाम झालेला नाही. काँग्रेस नगरातील एका शाळेजवळ रात्री वाळूचे ढिगारे तयार करून सकाळी ट्रॅक्टरमधून त्यांची विक्री होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
Vidarbha Farmers : ३५ टक्के शेतकरी मदतीपासून वंचित; दिवाळी अंधारातच
दरम्यान, शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात त्यांना अवैध बाजारात महाग दराने वाळू खरेदी करावी लागत आहे.
टिप्परभर वाळू ३० हजार रुपयांना विकली जात असल्याने, सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न महागडे ठरत आहे. वाळू माफियांच्या या कारवाया जिल्हा प्रशासनासमोर थेट आव्हान ठरत आहेत.
Local Body Elections : अमरावती जिल्ह्यात मतदार याद्यांवर १३ हजारांहून अधिक हरकती
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी देऊळगाव राजा तालुक्यात नदीपात्रात उतरून वाळू माफियांवर थेट कारवाई केली होती. त्या धर्तीवर नागरिकांचा सवाल आहे — “आता जिल्हाधिकाऱ्यांनी बुलढाणा शहरातील या वाळू माफियांच्या अड्ड्यांवर लक्ष देण्याची वेळ आली नाही का?”